ओसाड डोंगरात फुलवली फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 03:16 PM2019-01-16T15:16:19+5:302019-01-16T15:16:23+5:30

कुंभरी येथील पटले कुटुंबाची किमया : 1700 फूट अंतरावरून झ:यातून आणले पाणी

Flora Horticulture | ओसाड डोंगरात फुलवली फळबाग

ओसाड डोंगरात फुलवली फळबाग

Next

तळोदा : डोंगरावरील नैसर्गिक झ:यात एक हजार 700 फूट लांब नळी टाकून या पाण्यातून वनपट्टय़ात आंबे, पेरू, सिताफळ या फळबागा फुलविण्याची किमया सातपुडय़ातील आदिवासी पटले कुटुंबाने केली आहे. त्यांच्या अथक परिश्रमातून ओसाड डोंगरात हिरवं नंदनवनच फुलल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे उंच डोंगरातील त्यांचे पाणी व्यवस्थापन खरोखरच कौतुकास्पद आहे.
सातपुडय़ातील कुंभरी हे 300 लोकवसती असलेल छोटसं गाव. वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे शासनाकडून मिळालेल्या वनपट्टय़ावरच त्यांना आपला उदरनिर्वाह करावा लागत असतो. त्यातील 100 जणांना शासनाकडून सामूहिक वनपट्टे मिळाली असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. डोंगरावरील मिळालेल्या सामूहिक वनपट्टय़ात लावण्यासाठी गेल्या वर्षी जून महिन्यात जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते साधारण दीड ते दोन हजार आंबा, पेरू, सिताफळ, बोर, महू, साग अशी रोपे मिळाली होती. ही सगळी रोपे राजा बोरखा पटले, सोमा बोरखा पटले या बंधूंनीदेखील आपल्याला मिळालेल्या वनपट्टय़ात लावली. तथापि, ही रोपे जगविण्यासाठी त्यांच्यापुढे पाण्याचा यक्ष प्रश्न होता. कारण मिळालेला वनपट्टादेखील उंच टेकडीवरच आहे. त्यामुळे साहजिकच पाणी पोहचणे अशक्य होते. मात्र त्यांच्यातील मेहनत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी त्यांच्या शेतापासून एक हजार 700 फूट लांब उंचीवरील नैसर्गिक झ:याचे पाणी आणण्याची युक्ती लढविली. या झ:याच्या ठिकाणी मोठी विहीर खोदून तेथून तेवढय़ाच लांबीची नळी टाकून या नळीद्वारे दररोज झाडांना पाणी घालत आहेत. जवळपास दीड वर्षाची ही फळबाग झाली आहे. आंबे 250, पेरू 230, बोर 250, सिताफळ 250 या फळ पिकांबरोबरच महू 150, साग 100 व साग 250 अशी साधारण दीड-दोन हजार झाडे जगविली आहेत. त्यामुळे ओसाड रानावर हिरवे नंदनवन फुलविण्याची किमया या पटले बंधूंनी  केली आहे. विशेष म्हणजे पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापनातून आपल्या वनपट्टय़ात मेथी, टमाटर, वांगे, मिरची व वालपापडी या सारखी भाजी पाल्याची आंतरपिकेदेखील ते घेत आहेत. त्याच्या विक्रीतून ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. सातपुडय़ातील झ:याच्या पाणी व्यवस्थापनासाठी त्यांना साधारण 25 हजार रुपये खर्च आल्याचे या शेतक:यांनी सांगितले. या पैशातून 20 फुटाचे 90 पाईप लागल्याचे ते म्हणाले. छोटय़ाशा पाण्याच्या स्त्रोतात एकही थेंब वाया न जावू               देता प्रत्येक झाडाला आपल्या               अथक प्रय}ातून पाणी पुरवित असल्याचेही सेगा पटले सांगतात.
पर्यावरण बचावाच्या नावाखाली वार्षानुवर्षे द:याखो:यात, जंगलात राबणा:या आदिवासी शेतक:यांना शेतक:यांचा दर्जा नाकारला जात असतांना पटले बंधूंनी आपल्या कौशल्यातून ओसाड, खडकाळ टेकडीवर फळबाग लावून हिरवे नंदनवन फुलविण्याची किमया साधली आहे. एकीकडे वृक्ष         लागवड आणि संगोपनासाठी वनविभाग करोडो रुपये खर्च करूनही सातपुडा अजून हरित झाला        नसल्याचे चित्र आहे. मात्र कुंभरीकरांनी कमी खर्चात आपला परिसर हरित करून दाखविला. त्यामुळे या गावक:यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.
 

Web Title: Flora Horticulture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.