शहादा सीसीआय केंद्रात ३०० वाहने दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:03 PM2020-02-19T12:03:05+5:302020-02-19T12:03:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा बाजार समितीत कापूस खरेदी सुरु झाल्यानंतर मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ३०० वाहनांमधून १५ ...

Five vehicles lodged at Shahada CCI Center | शहादा सीसीआय केंद्रात ३०० वाहने दाखल

शहादा सीसीआय केंद्रात ३०० वाहने दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा बाजार समितीत कापूस खरेदी सुरु झाल्यानंतर मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ३०० वाहनांमधून १५ हजार क्विंटल कापूस आवक झाली़ सीसीआयचे केंद्र गेल्या चार दिवसांपासून बंद होते़ मंगळवारी केंद्र पुन्हा नव्याने सुरु झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस आवक झाली़
एकीकडे शहादा केंद्रात वाहनांची नोंदणी सुरुच असताना पळाशी ता़ नंदुरबार येथील सीसीआयचे खरेदी केंद्र बुधवार ते रविवार या कालावधीत बंद राहणार आहे़ नंदुरबार केंद्रात तब्बल ७० हजार क्विंटल कापूस आवक गेल्या तीन महिन्यात झाली आहे़ यातून कापूस निर्यात संथावली असल्याने येथे तयार केलेल्या गाठी ठेवण्यासाठी जागा नसल्याने खरेदी बंद करुन नव्याने येणाऱ्या कापसासाठी जागा तयार करावी लागत आहे़ यातून हे केंद्र येत्या सोमवारीच सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
शहादा सीसीआय केंद्रात मंगळवारी आलेल्या ३०० वाहनांपैकी १२५ वाहनांचा पहिला लॉट दिवसभरात मोजण्यात आला यातून पाच हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे़ यंदा शहादा केंद्र तब्बल २ लाख क्विंटलच्या पुढे कापूस खरेदी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ या कापसाला ठेवण्यासाठी जागा नसल्याने बाजार समितीकडून दाखल झालेल्या वाहनातून कापूस मोजणी करण्यापूर्वी जेसीबीने खरेदी केलेला कापूस दूर सारुन जागा तयार करत असल्याचे चित्र दिसून आले होते़

सातत्याने बंद पडणाºया कापूस खरेदीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत़ साधारण साडेपाच हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल कापसाची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे़ परंतू बंद पडणाºया खरेदीमुळे अडचणी येत आहेत़ यातून बºयाच शेतकºयांनी खेडा खरेदी करणाºया व्यापाºयांना मालाची विक्रीही केली आहे़ शहादा बाजार समितीत सुटीच्या दिवशीही नोंदणी झालेल्या वाहनांमधील कापसाची मोजणी करण्याचे हाती घेण्यात आल्याची माहिती सचिव संजय चौधरी यांनी दिली आहे़

Web Title: Five vehicles lodged at Shahada CCI Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.