शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

सातपैकी पाच लघुप्रकल्पात ठणठणाट

By admin | Published: March 24, 2017 12:21 AM

शहादा तालुक्यातील स्थिती : दुर्लक्ष व निधीअभावी प्रकल्पांची दुरुस्ती रखडली

प्रकाशा : शहादा तालुक्यातील सातपैकी पाच लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाट असून दोन प्रकल्पांमध्ये बºयापैकी पाणीसाठा आहे. दुरुस्तीअभावी या प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ न शकल्याने पिण्यासाठी व सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.शहादा लघुपाटबंधारे उपविभाग अंतर्गत तालुक्यात दूधखेडा, खापरखेडा, कोंढवळ, लंगडीभवानी, लोंढरे, राणीपूर व शहाणे हे सात लघुप्रकल्प आहेत. आजच्या स्थितीत  खापरखेडा प्रकल्पात २७ टक्के तर कोंढावळ प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा आहे. इतर पाच प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. लंगडीभवानी प्रकल्प कोरडाठाक झाला असून दुधखेडा धरणात नऊ टक्के, राणीपूर धरणात १६ टक्के, लोंढरे धरणात आठ टक्के तर शहाणे धरणात फक्त तीन टक्के जलसाठा आहे.शहादा तालुक्यातील सातही लघुप्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने जलसाठा राहिला असता तर त्याचा फायदा शेतकºयांना सिंचनासाठी झाला असता. तसेच पिण्याच्या पाणीटंचाईही काही प्रमाणात कमी झाली असती. परंतु निधीअभावी व संबंधित विभागाच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे या प्रकल्पांची दुरुस्ती होऊ न शकल्याने या प्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी अडविले जात नसल्याने ते ठणठणाट झाले आहेत.दूधखेडा येथील धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे पाणी अडवता येत नाही. या धरणाची पाहणी करून दुरुस्तीसाठी प्रस्तावही पाठविला आहे. परंतु अजूनही दुरुस्ती झाली नाही. धरणाच्या गळतीमुळे फक्त नऊ टक्के जलसाठा आहे. खापरखेडा धरणाच्या उजव्या बाजूला गळती लागली आहे. अडवलेले पाणी त्यातून निघून जाते. या धरणाचे गेटही नादुरुस्त आहे. खालील बाजूला तीन ठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. या कामासाठी ७५ लाख रुपयांच्या निधीचा प्रस्तावही मंजुरीसाठीसाठी पाठविला. मात्र दुरुस्ती झाली नसल्याने या धरणात २७ टक्के जलसाठा शिल्लक आहे.लंगडीभवानी लघुप्रकल्प कोरडा झाला आहे. लोंढरे धरणाचेही गेट नादुरुस्त असल्याने पाणीसाठा होत नाही. या धरणाच्या दुरुस्तीसाठी सर्वे होऊन दुरुस्तीचे काम प्रस्तावीत आहे. मात्र निधी उपलब्ध झाल्यावर धरणाची दुरुस्ती होईल. अन्यथा पुढीलवर्षीही या धरणात पुरेसे पाणी साठवता येणार नाही. या धरणात आजच्या स्थितीला आठ टक्के जलसाठा आहे. राणीपूर धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ भरला गेल्याने धरणाचे क्षेत्र उथळ झाले आहे. २००६ मध्ये आलेल्या महापुरात या धरणाच्या वरील बाजूचे दोन पाझर तलाव फुटले होते. या तलावांमधील गाळ, माती या धरणात अडकली होती. त्यामुळे धरण उथळ झाले असल्याने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नाही. पावसाळ्यापूर्वी या धरणातील गाळ काढणे   आवश्यक असून येथे १६ टक्के जलसाठा आहे. शहाणे येथील धरणालाही गळती लागली असून गेट नादुरुस्त आहे. पावसाळा कमी झाला व धरण नादुरुस्त असल्याने या धरणात फक्त तीन टक्के जलसाठा शिल्लक आहे.शहादा तालुक्यातील या सातही लघुप्रकल्पांची आवश्यक ती दुरुस्ती झाली तर पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होऊ शकतो. त्यामुळे लघुप्रकल्पांच्या क्षेत्रातील शेतीला सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. तसेच पाणीटंचाईची समस्याही काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे व निधीअभावी या धरणांची दुरुस्ती होत नसल्याने शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे.     (वार्ताहर)पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती आवश्यकशहादा तालुक्यातील सातही लघुप्रकल्पांची गळती, गेट व इतर दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. येणाºया पावसाळ्यात या लघुप्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने जलसाठा होऊन त्याचा फायदा सिंचनासाठी झाल्यास शेतकºयांना उत्पन्न वाढीसाठी हातभार लागणार आहे. उन्हाळ्यात जाणवणाºया पाणीटंचाईवरही मात करता येऊ शकणार आहे. त्यासाठी लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून निधी उपलब्ध करून या लघुप्रकल्पांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.