कोठली हाणामारीप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:04 PM2020-06-22T12:04:58+5:302020-06-22T12:43:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : कोठली तर्फे सारंगखेडा ता.शहादा येथे १९ जून रोजी रात्री झालेल्या मारहाण प्रकरणात विनयभंग आणि ...

Filed a case of molestation in a fight | कोठली हाणामारीप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल

कोठली हाणामारीप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : कोठली तर्फे सारंगखेडा ता.शहादा येथे १९ जून रोजी रात्री झालेल्या मारहाण प्रकरणात विनयभंग आणि साथीचे रोग प्रतिबंध नियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये १९ जणांसह इतर १० ते १५ जणांवर सारंगखेडा पोलीस ठाण्यात दुसरा परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोठली त.सा. येथे १९ जून रोजी रात्री दोन गटात हाणामारी झाली होती़ मारहाणीच्या घटनेनंतर २२ जणांवर अ‍ॅट्रॉसिटी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी दुसऱ्या गटाकडूनही फिर्याद देण्यात आली आहे़ यातून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत़ याबाबत पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या मुलाने संशयित आरोपींच्या घरी जाऊन मारहाण केली याचा राग येऊन कैलास रोहिदास गवळे, सुनील पिरन गवळे, राकेश राजेंद्र गवळे, राहुल प्रताप शिरसाठ, किरण अंबर शिरसाठ, संदीप अंबर शिरसाठ, भाऊसाहेब अंबर शिरसाठ, विजय सुनील गवळे, आप्पा ब्रिजलाल गवळे, सुरेश उखा गवळे, संजय कचरू गवळे, जीवन नाना गवळे, कृष्णा रतिलाल गवळे, भैय्या अनिल साळवे, बंटी उर्फ विनोद पंडितराव गायकवाड, निलेश आनंदा गवळे, मोठ्या भुºया गवळे, प्रशांत प्रकाश शिरसाठ, सुरेश प्रताप शिरसाठ उर्फ नाना टेलर व इतर १० ते १५ जणांनी १९ जून रोजी रात्री आठ वाजता गर्दी करून हातात लाठ्या-काठ्या घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करीत दुखापत केली होती़ दरम्यान व घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून त्यांना दमदाटी करून शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे़ पिडित महिलेच्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलीस ठाण्यात १९ जणांसह इतर १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी भेट दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत. दरम्यान कोठली येथील मारहाण प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला़ याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे़

Web Title: Filed a case of molestation in a fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.