कवठळ शिवारात शेताचा झाला नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:24 PM2019-09-20T12:24:08+5:302019-09-20T12:24:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाने पुन्हा शहर व ग्रामीण भागाला झोडपून ...

Field drainage in the lower reaches | कवठळ शिवारात शेताचा झाला नाला

कवठळ शिवारात शेताचा झाला नाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाने पुन्हा शहर व ग्रामीण भागाला झोडपून काढले. पपई व कापसाच्या शेतात पाणी शिरल्याने अनेक शेतक:यांच्या शेतातील पपईची झाडे उन्मळून पडली आहेत.  कवठळ शिवारातील एका शेतात नाल्याचे पाणी शिरल्याने या शेताला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
तालुक्यातील मामाचे मोहिदे गावालगत असलेल्या नाल्यावरील फरशी तुटल्याने वाहतूक गावातून वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या आठवडय़ात थातूरमातूर काम केल्याने संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लोंढरे, जयनगर, वडछील, शोभानगर पुनर्वसन, डोंगरगाव, ससदे, मामाचे मोहिदे, सोनवद, सावळदा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक शेतक:यांच्या शेतातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारासही जोरदार पाऊस झाला होता. बुधवार व गुरुवारच्या पावसामुळे शेतांना तलावाचे स्वरुप आले आहे. काही शेतक:यांच्या कापूस व पपई पिकाचे मोठे नुकसान झाले. कवठळ येथील अण्णा पाटील यांच्या चार एकर शेतात कहाटूळ गावाकडून येणा:या नाल्याचे पाणी शिरल्याने अक्षरश: नाला निर्माण झाल्याने संपूर्ण शेती नापिकी झाली आहे. 
मामाचे मोहिदे गावालगत असलेल्या जय  जवान जय किसान महाविद्यालयाला लागून असलेली फरशी 15 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे फरशीचा काही भाग तुटून पडलेला होता. त्यानंतर त्याठिकाणी मुरूम टाकून तात्पुरती डागडूजी करण्यात आली होती. अवजड वाहनांची वाहतूक गावातून वळविण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या फरशीचे दुरुस्तीचे थातूरमातूर काम झाल्याने बुधवारी व गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या फरशीवरील काँक्रिट रस्ता उखडून  नाल्यामध्ये वाहून गेल्याने त्याठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी फरशी पूल तुटल्याने त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे
बुधवारी सायंकाळी व गुरुवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शहादा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लोंढरे, जयनगर, वडछील, शोभानगर पुनर्वसन, डोंगरगाव, ससदे, मामाचे मोहिदे, सोनवद, सावळदा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप निर्माण झाले आहे. काही शेतांमधील पपईची झाडे उन्मळून पडली आहेत.
 

Web Title: Field drainage in the lower reaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.