शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

नवापुरात निकालाच्या घोषणेनंतर ‘कही खुशी कही गम’ची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 10:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : नवापुर मतदार संघावर पुन्हा एकदा कॉग्रेसने सत्ता स्थापित केली आह़े पालिकेच्या नगरभवनात गुरुवारी झालेली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : नवापुर मतदार संघावर पुन्हा एकदा कॉग्रेसने सत्ता स्थापित केली आह़े पालिकेच्या नगरभवनात गुरुवारी झालेली मतमोजणी कही खुशी कही गम असाच अनुभव देणारी होती़ 2 लाख 17 हजार 768 मतदारांनी आजच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. सकाळी आठ वाजेपासुन चौदा टेबलांवर 24 फे:यांमध्ये मतांची मोजणी करण्यात आली. चार तासात मतमोजणी पूर्ण होऊन निकाल समोर आला़  परंतू प्रशासनाने दुपारी दोन वाजता अधिकृत निकालाची घोषणा केली़मतमोजणीत पहिल्या फेरीपासुन कॉग्रेस उमेदवार शिरीष नाईक यांनी  आघाडी घेतली होती़ ही आघाडी शेवटच्या फेरीपयर्ंत कायम होती. मतमोजणी केंद्राच्या परिसरात पोलीसांनी कडक पहारा बसविला होता. खुद्द जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित होते. मतमोजणीची उत्सुकता लागुन असलेले हजारो कॉग्रेस समर्थक परिसरात एकत्रित झाले होते. विसाव्या फेरीनंतर शिरीष नाईक यांची विजयाची खात्री झाल्यानंतर समर्थकांनी घोषणा देत फटाके फोडण्यास सुरुवात केली. सुमारे 11 हजाराहुन अधिक मतांनी शिरीष नाईक विजयी झाल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ महाविद्यालय परिसरात कार्यकर्ते एकत्रित येऊन जल्लोष सुरु करण्यात आला़  शिरीष नाईक यांनाही मोह आवरता आला नाही व त्यांनीही ठेका धरला.  दिवंगत व प्रथम जिल्हा परिषद अध्यक्षा स्वर्गीय हेमलता वळवी यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करुन तेथुनच घोषणा देत विजयी रॅली काढण्यात आली. मुख्य मार्गावरुन रॅली काढून साईबाबा व गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शिरीष नाईक यांनी कॉग्रेस भवनात भेट दिली. ज्येष्ठ नेते आमदार सुरुपसिंग नाईक यांचे आशिर्वाद घेत त्यांनी घेतल़े त्यांच्यासोबत अजित नाईक, पत्नी रजनी नाईक, विनोद नाईक, सुनिता नाईक, मालती नाईक, रतनजी गावीत, नरेंद्र नगराळे, रमेश गावीत आदी उपस्थित होते. दोन ठिकाणी मार्गदर्शन करतांना शिरीष नाईक यांनी मतदारांचे आभार व्यक्त करुन अडचणीच्या प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन दिल़े दुसरीकडे भरत गावीत यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते व सामान्य चाहत्यांनी एकच गर्दी करुन त्यांच्याविषयी आस्था व्यक्त केली. जनतेचा निकाल मान्य असून एवढ्या कमी अवधीत मोठय़ा संख्येने लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झाल्याचे व त्याचे श्रेय कार्यकर्ते यांना असल्याचे भरत गावीत यांनी सांगितले.पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवत गर्दीवर नियंत्रण ठेवले होत़े नगरभवन परिसरातील रस्त्यांवर बॅरिकेंटींग करुन वाहतूक नियंत्रण करण्यात आले होत़े यातून वाहतूक कोंडी टळली होती़