खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:56 PM2020-06-22T12:56:51+5:302020-06-22T12:57:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : मागील आठवड्यात पावसनाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे तळोदा तालुक्यातील शेतशिवारात पेरणीच्या कामाला वेग आला असून ...

Farmers struggle to buy fertilizer | खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : मागील आठवड्यात पावसनाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे तळोदा तालुक्यातील शेतशिवारात पेरणीच्या कामाला वेग आला असून पिकांसाठी खत घेण्यासाठी शेतकरी दुकानांवर गर्दी करीत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या फटक्यामुळे नंतर सहज खत उपलब्ध होणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतशिवारात पेरणीच्या व मशागतीच्या कामांना शेतकºयांनी वेग दिला आहे. अनेक शेतकºयांनी ऊस, केळी, कापूस, सोयाबीन, कडधान्य, भाजीपाला आदी पिकांची लागवड केली आहे. पिकाची वाढ व पोषण होण्यासाठी पिकाला वेळेवर खत देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकºयांच्या चिंता वाढल्या होत्या. त्यातच खरेदी-विक्री संघाने खत उपलब्ध करून दिल्याने खत खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. खतटंचाई व लॉकडाऊनची भीती लक्षात घेता खत उपलब्ध असताना जास्तीत जास्त खत खरेदी करण्यासाठी शेतकºयांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. त्यात युरियाचा तुटवडा भासत आहे. कोरोना महामारीचा फटका मोठ-मोठ्या उद्योगांना बसला आहे. याला खतांच्या कंपन्याही अपवाद राहिल्या नाहीत. कंपन्यांमध्ये खत निर्मिती, वाहतूक व अन्य प्रक्रियेसाठी मजूर टंचाई भासत असल्याने युरिया खत येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांची गैरसोय होत असून जेवढे उपलब्ध होईल तेवढे खत मिळविण्यासाठी शेतकºयांची धडपड दिसून येत आहे. आधीच लॉकडाऊन, वादळ यासारख्या अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करणाºया बळीराजाला पुढील काळात युरिया व अन्य अत्यावश्यक खते आवश्यक प्रमाणात व वेळेवर पुरविण्याचे प्रयत्न कृषी विभागाकडून केले जात आहेत.
दरम्यान, खते खरेदी करण्यासाठी तळोदा खरेदी-विक्री संघासमोर तालुक्यातील शेतकºयांच्या भल्या मोठया रांगा लागत आहेत. तळोदा शहरात कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने शहरातील बाजार व सर्व व्यापारी प्रतिष्ठाने पाच दिवस बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. त्यात कृषी क्षेत्रातील आस्थापने व दुकाने सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता शेतकºयांनी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करून खत खरेदी करणे गरजेचे आहे. कृषी विभागामार्फत शेतकºयाला शेताच्या बांधावर खत पुरविण्यात येण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. खत खरेदी करण्यासाठी शेतकºयांनी दुकानावर मोठया प्रमाणात गर्दी करू नये. दुकानावर खत खरेदी दुकानांवर जाताना शेतकºयांनी स्वत:ची काळजी घेत सर्व प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Farmers struggle to buy fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.