शेतकरी कर्जमुक्तीला गोंधळाची युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:59 AM2020-01-13T11:59:07+5:302020-01-13T11:59:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक कामकाजामुळे मागे पडलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत ९ जानेवारी रोजी ...

Farmers debt relief tricks | शेतकरी कर्जमुक्तीला गोंधळाची युक्ती

शेतकरी कर्जमुक्तीला गोंधळाची युक्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक कामकाजामुळे मागे पडलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत ९ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत़ परंतू या याद्या फक्त जिल्हा बँक लाभार्थींच्या असून राष्ट्रीयकृत बँकांनी साडेचार हजार आधार लिंक नसलेले शेतकरी पुढे करुन वेळ मारुन नेली आहे़ बँकांच्या या युक्तीमुळे गोंधळात भर पडला असून कर्जमुक्तीबाबत संभ्रम अधिक वाढला आहे़
२०१५ पासून थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेत शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पुढे आणली आहे़ योजनेचा अध्यादेश काढल्यानंतर बँकांनी सात जानेवारीपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या ्रप्रकाशित करण्याची मुदत होती़ यात आधार लिंक नसलेल्या शेतकºयांना माहिती देऊन ते लिंक करुन घेण्याचे ठरले होते़ जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूकीमुळे हे कामकाज लांबून प्रत्यक्षात ९ जानेवारी रोजी याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत़ यांतर्गत जिल्हा बँकेचे १७ हजार सभासद पात्र असताना साधारण १४ हजार शेतकरी लाभार्थींच्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत़ या याद्या त्या-त्या ग्रामपंचायत, बँक शाखा आणि गावात दवंडी देऊन प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती प्रशासन देत आहे़ दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांनी याद्या प्रसिद्ध करण्याची वेळ आल्यानंतर आधार लिंक नसलेल्या शेतकºयांच्या याद्या त्याच्यांकडून दिल्या गेल्या आहेत़ परंतू आधार लिंक पूर्ण असलेल्या शेतकºयांचे काय, याबाबत उत्तर देताना मात्र बँकांचा गोंधळ स्पष्टपणे समोर येत आहे़ या प्रकारामुळे नंदुरबार जिल्ह्यात पात्र लाभार्थींची संख्या किती हे अद्याप समोर आलेले नाही़
राष्ट्रीयकृत बँकांकडून पात्र लाभार्थींच्या याद्या देण्याबाबतची कारवाई कधी होणार याचेही उत्तर नसल्याने जिल्ह्यातील पात्र शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे़ प्रशासनाने राष्ट्रीयकृत बॅकांच्या कामकाजाकडे गांभिर्याने पाहून कारवाई करण्याची अपेक्षा शेतकºयांकडून करण्यात येत आहे़

१ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जवाटप करणाºया ३०७ विविध कार्यकारी संस्थांचा अहवाल जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे देण्यात आला आहे़ जिल्हा बँकेकडून कर्ज घेत एकूण ३०७ संस्थांनी १४ हजार ५७८ शेतकºयांना कर्जवाटप केले होते़ व्याजासह या कर्जाची रक्कम ही १०१ कोटी ९८ लाख ९५ एवढी आहे़ १४ हजार शेतकºयांच्या नावांच्या ३०७ याद्यांची तपासणी लेखापरीक्षक यांनी करुन दिल्यानंतर १३ हजार ९१६ शेतकºयांना पात्र ठरवण्यात आले आहे़ या शेतकºयांचे ८५ हजार १५ लाख ६६ हजार रुपयांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ यातील किती शेतकरी आधार लिंक केलेले आहेत़ याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही़ विशेष बाब ८५ कोटीपैकी २१ कोटी २५ लाख रुपये केवळ व्याजाची रक्कम मूळ कर्ज रक्कम ६३ कोटी एवढी आहे़

जिल्हा बँकेच्या अहवालानुसार नंदुरबार तालुक्यातील ५ हजार ८९३, शहादा ४ हजार २८९, तळोदा ९६९, नवापुर १ हजार ६०३, अक्कलकुवा ४८९ तर धडगाव तालुक्यातील ७२३ शेतकरी कर्जमुक्तीला पात्र ठरणार आहेत़
दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांनी साडेचार हजार शेतकºयांची नावे असलेल्या याद्या प्रकाशित केल्या आहेत़ या याद्यांनुसार ज्यांचे आधार लिंकिंग नाहीत, त्यांनी लिंक करावयाचे आहे़ यानंतर त्यांना कर्जमाफी मिळणार आहे़ परंतू ज्यांचे आधीपासूनच आधार लिंक आहेत त्या शेतकºयांच्या याद्यांचे काय, याबाबत माहिती मात्र देण्यात आलेली नाही़ जिल्ह्यात एकूण ११ राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्ये कामकाज सुरु असल्याची माहिती आहे़

शासनाने जाहिर केलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या अध्यादेशात आधार लिंक नसलेल्या शेतकºयांच्या याद्या आधी प्रकाशित करण्याचा कोणताही उल्लेख नसताना बँकांनी केलेल्या कामकाजामुळे गोंधळ निर्माण होत आहे़
प्रशासनाकडून ग्रामस्तरावर कामकाज करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू अद्याप कोणत्याही गावात दवंडी देणे किंवा कर्जमुक्तीबद्दल माहिती देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे ग्रामीण भागातील बँकांबाहेरही याद्या दिसलेल्या नाहीत़

Web Title: Farmers debt relief tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.