शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

शेतक:यांचे ‘पांढरे सोने’ खरेदीचा मूहूर्त एक दिवस पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:48 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळी पावसावर खापर फोडून बाजार समितीच्या पळाशी ता़ नंदुरबार येथील खरेदी केंद्रात बुधवारी कापूस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवकाळी पावसावर खापर फोडून बाजार समितीच्या पळाशी ता़ नंदुरबार येथील खरेदी केंद्रात बुधवारी कापूस खरेदी सुरु होणार होती़ परंतू ही खरेदी आणखी एक दिवस पुढे ढकलली गेली असून कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआय खरेदीसाठी मैदानात येणार असल्याने शेतक:यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत़      यंदा पावसाने सरासरी 130 टक्के हजेरी लावल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आह़े यात काही दिवसांपूर्वी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे कापूस पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आह़े यातून दरवर्षी ऑक्टोबरमध्ये सुरु होणारी कापूस खरेदी प्रथमच नोव्हेंबर मध्यार्पयत सुरु झालेली नाही़ गेल्या आठवडय़ात बाजार समितीने 13 नोव्हेंबरपासून कापूस खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने शेतक:यांना हायसे वाटले होत़े परंतू यातही पुन्हा एका दिवस वाढ करुन आता ही खरेदी प्रत्यक्षात 14 नोव्हेंबर रोजी सुरु होणार आह़े यातून जिल्ह्यात शेतक:यांना पुन्हा एक दिवसाची प्रतिक्षा करावी लागणार आह़े दरम्यान सीसीआयने जिल्ह्यात 5  हजार 5450 ते 5 हजार 550 या दराने प्रतीक्विंटल कापूस खरेदी करणार असल्याचे यापूर्वी जाहिर केले आह़े त्यानुसार गुरुवारपासून कारवाई होणार आह़े गेल्यावर्षाच्या दरांमध्ये वाढ न करता सीसीआयने तेच दर कायम ठेवत खरेदीला सुरुवात करण्याचे निश्चित केले असल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली आह़े बाजार समितीत परवानाधारक चार व्यापा:यांकडून आधीच कापसाला साधारण 4 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आला आह़े या दरांच्या उलट सीसीआयने दरवाढ केल्याने शेतक:यांचा ओढा हा सीसीआयकडे अधिक असणार असल्याने यंदा सीसीआय विक्रमी खरेदी करु शकेल असा अंदाजही वर्तवला जात आह़े  दमदार पावसाच्या बळावर जिल्ह्यात यंदा 2 लाख 88 हजार 604 हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या करण्यात आल्या होत्या़ यात कापसाचा सर्वाधिक 1 लाख 28 हजार 287 हेक्टर एवढा वाटा होता़ निर्धारित क्षेत्रापेक्षा 127 टक्के कापूस लागवड झाल्याने शेतक:यांमध्ये उत्साह होता़ गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे या उत्साहावर विरजण पडले आह़े सीसीआयने हमीभाव 5 हजार 550 रुपये प्रतिक्विंटल जाहिर केला आह़े परंतू संपूर्ण कोरडा असलेला आणि चांगल्या लांबींच्या कापसालाच हे दर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात गेल्या 10 दिवसातील बदलत्या वातावरणामुळे ेकापसातील ओलावा वाढला आह़े यामुळे कोरडा कापूस पहिल्या दिवशी बाजारात आणणे शेतक:यांना शक्य नसल्याचे चित्र सध्यातरी आह़े   कापूस कोरडा नसल्यास अनेकांना परत फिरवण्याचे प्रकार व्यापा:यांनी यापूर्वी केले असल्याने गुरुवारपासून सुरु होणा:या खरेदीदरम्यान योग्य त्या सूचना करुनच शेतक:यांना पाचारण करावे अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े सीसीआयने गेल्या वर्षी दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर शेतक:यांकडून केवळ 10 हजार क्विंटल अर्थात 2 हजार 229 गाठींची खरेदी केली होती़ ही खरेदी केल्यानंतर व्यवहार बंद करण्यात आले होत़े 2016-17 च्या हंगामात 25 हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस सीसीआयला खरेदी करता आला नव्हता़ गेल्या वर्षाच्या दरांनुसारच चालू वर्षात खरेदीला सुरुवात होणार असल्याने किमान 20 हजार क्विंटलच्या जवळपास कापूस खरेदीचा अंदाज आह़े गुरुवारी पहिल्यात दिवशी होणा:या कापूस आवकवरुन संपूर्ण हंगामाची स्थिती समोर येणार आह़े नंदुरबार येथे चार व्यापा:यांसह शहादा येथेही कापूस खरेदीला सुरुवात करण्यात येणार आह़े यंदा शेतक:यांकडून सूतगिरणीला आधीपासून कापूस देणे सुरु असल्याने सीसीआयकडे कापूस खरेदीसाठी येण्याची शक्यताही कमीच असल्याचे मत व्यापा:यांकडून वर्तवण्यात येत आह़े जिल्ह्यात शहादा आणि नंदुरबार सोबत तळोदा येथेही सीसीआयने खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी आह़े