अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 01:10 PM2021-01-22T13:10:10+5:302021-01-22T13:12:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : भरधाव मोटारसायकलस्वाराने ऊसतोड मजुराच्या दहा वर्षीय मुलीला  धडक देत उपचार करण्याचा बहाणा करुन पळवून ...

Eventually a kidnapping charge was filed | अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल

अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : भरधाव मोटारसायकलस्वाराने ऊसतोड मजुराच्या दहा वर्षीय मुलीला  धडक देत उपचार करण्याचा बहाणा करुन पळवून नेले होते. मंगळवारी    कढेल ता. तळोदा  फाट्याजवळ घडली होती. या घटनेला ४८ तास उलटूनही बालिका व फरार दुचास्कीस्वार अद्याप सापडलेला नाही. बालिकेला घेवून फरार झालेल्याचा पोलीसांकडून कसून शोध घेतला असून या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. 
दरम्यान घटनेनंतर बालिकेचे वडील मोत्या जेरमा पटले. रा घाटली आग्रीपाडा यांनी गुरुवारी दुपारी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारपासून पसार असलेला व्यक्ती मिळून येत नसल्याने  पोलिसांनी तीन पथके तयार करून गठित करून बालिकेच्या जिल्हयासह शेजारील गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील विविध सीमावर्ती शहरांमध्ये तपास सुरु केला आहे.  मंगळवारी दुपारी मोड ते तळोदा रस्त्यावर कढेल  फाट्याजवळ अज्ञात दुचाकीस्वाराने धडक देऊन बालिकेला जखमी केले व तिला दवाखान्यात घेऊन जाण्याचे कारण सांगून सोबत घेवून गेला होता. यानंतर बराच वेळ होवूनही दुचाकीस्वार न आल्याने बालिकेच्या पालकांनी शोध सुरु केला होता. यातून त्यांनी तळोदा पोलीसांना कळवले होते.  पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांनी घटनेचेे गांभिर्य लक्षात घेत  बुधवार सायंकाळपासून पथकांना कामाला लावत रवाना केले होते.  
 पथकांचा शोध सुरु असतानाच अज्ञात मोटारसायकलस्वार आणि बालिका मिळून येत नसल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. 

तीन पथकांकडून शोध सुरु 
अज्ञात मोटारसायकलस्वाराचा शोध घेण्यासाठी शोधासाठी पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनात  तीन पथके गठीत करण्यात आली आहेत.  पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार व पोलिस उपनिरीक्षक अभय मोरे हे तिन्ही पथकांचे प्रमुख असून प्रत्येक पथकात तीन पोलिस कर्मचाऱ्यांची समावेश आहे. 
 या पथकांनी मध्य प्रदेश राज्यातील खेतिया, पानसेमल येथे तर गुजरात राज्यातील कुकरमुंडा,निझर, यांच्यासह अन्य ठिकाणी शोध घेतला जात आहे. सोबतच शहादा, नंदुरबार,  नवापूर, धडगाव, अक्कलकुवा, तळोदा तालुक्यात देखील मुलीचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. 
 

Web Title: Eventually a kidnapping charge was filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.