ब्राह्मणपुरी येथे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांनी मोठ्या गावामध्ये कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या सूचनेनुसार ब्राह्मणपुरी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. २० रुग्ण या विलगीकरण कक्षात दाखल होऊ शकतील. या कक्षात एकूण चार रुग्ण दाखल झाले असून आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. या वेळी ब्राह्मणपुरीच्या मंडळ अधिकारी निकिता नायक, तलाठी स्मिता पाटील, ग्रामविकास अधिकारी गोपाळ पाटील, वैद्यकीय अधिकारी डाॅ. विजय पाटील, ताई जाधव, अलका मारनर, पोलीस पाटील रवींद्र पवार, ग्रा.पं. शिपाई कैलास बिरारे आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी सहकार्य करावे
गावात कोरोना रुग्ण आढळत असून कोणीही लपवण्याचा प्रयत्न करू नये. जो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल त्यांनी तत्काळ संबंधित आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासनाला संपर्क करून गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेत विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांची सोय करण्यात आली असून आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात असल्याचे सांगण्यात आले.