लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बांधकाम विभागाचे ४० वर्षीय अधिकाऱ्यांचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता़ त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यां्या कुटूंबातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांना सिव्हीलमध्ये हलवण्यात येत आहे़पॉझिटिव्ह आलेल्यात बाधित अधिकाºयांची ६८ वर्षीय आई, ४३ वर्षीय पत्नी, १५ वर्षीय मुलगी, २० वर्षाचा मुलगा यांच्यासोबत त्यांच्या संपर्कात आलेली ३१ वर्षीय महिला आणि १२ वर्षांची एक मुलगी अशा सहा लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ हे सर्व कुटूंब शहरातील पीडब्ल्यूडी क्वारटर्समध्ये निवासी होते़ त्याठिकाणी फवारणी व सॅनेटायझेशन सुरु करण्यात आले असून हा परिसर आधीच कंटेन्मेेंट झोन आहे़ सहा जणांमुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांचे अर्धशतक एकाच दिवसात पूर्ण झाले आहे़
‘त्या’ अधिकाऱ्याचं अख्खं कुटूंबच निघालं पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 22:47 IST