कवळीथ येथील बंधाऱ्याची दुरुस्ती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:51 PM2020-05-24T12:51:38+5:302020-05-24T12:51:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील कवळीथ येथील ब्रिटिशकालीन बंधाºयाच्या संरक्षक भिंतीची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी. या बंधाºयाचा दोन ...

The embankment at Kavalith will be repaired | कवळीथ येथील बंधाऱ्याची दुरुस्ती होणार

कवळीथ येथील बंधाऱ्याची दुरुस्ती होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील कवळीथ येथील ब्रिटिशकालीन बंधाºयाच्या संरक्षक भिंतीची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी. या बंधाºयाचा दोन ते तीन हजार हेक्टर क्षेत्रास प्रत्यक्ष लाभ होत असतो. तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत असल्याने बंधाºयाची प्राधान्याने दुरुस्ती करावी, अशा सूचना आमदार राजेश पाडवी यांनी दिल्या.
आमदार पाडवी यांनी शुक्रवारी कवळीथ येथील बंधाºयाला भेट देऊन पाहणी केली. गेल्यावर्षी हा बंधारा नादुरुस्त झाला असल्याने त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी यापूर्वी आमदार पाडवी यांच्याकडे केल्या होत्या. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे या बंधाºयाच्या कालव्याची संरक्षक भिंत पडून गेल्याने गोमाई नदीचे पाणी कालव्यात वळवता आले नाही. त्यामुळे हा कालवा बंद पडला असून लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे ही भिंत त्वरित दुरूस्त करण्यात यावी, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल. संबंधित यंत्रणेला अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जिल्हा नियोजन किंवा इतर माध्यमातून निधी उपलब्ध करून कालवा सुरु करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन हा प्रश्न मार्गी लावू, असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. या वेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, जि.प.चे माजी सदस्य सुनील चव्हाण, योगेश पाटील, खेडदिगरचे संरपच अविनाश मुसळदे, विरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, पाटबंधारे विभागाचे अभियंता एम.बी. पाटील, मोहिदाचे संरपच गिरधर पाटील, उपसरपंच पुरुषोत्तम पाटील, राजाराम पाटील, जगदीश पाटील, ईश्वर पाटील, गोगापूरचे संरपच विजय सोनवणे, भागापूरचे संरपच निलेश पाटील, कवळीथचे संरपच योगेश पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: The embankment at Kavalith will be repaired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.