जिल्हाभरात भाजपचे एल्गार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:06 PM2020-02-26T13:06:48+5:302020-02-26T13:06:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात सत्तेत आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून ...

Elgar agitation of BJP across the district | जिल्हाभरात भाजपचे एल्गार आंदोलन

जिल्हाभरात भाजपचे एल्गार आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात सत्तेत आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून याच सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचा आरोप करत भाजपने जिल्हाभर एल्गार आंदोलन केले़ या आंदोलनात भाजपच्या राज्य, जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती देत धरणे दिले़ सकाळी ११ वाजेपासून हे आंदोलन सुरु झाले होते़
नंदुरबार तहसील कार्यालयामोर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले़ यावेळी भाजप नेते राजेंद्रकुमार गावीत, नगरसेवक प्रशांत चौधरी, प्रदेश सदस्य सुदाम चौधरी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, पंचायत समिती उपसभापती लताबाई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पाटील, पंकज पाठक, नगरसेवक कमल ठाकूर, माणिक माळी, अशोक चोधरी, जितेंद्र गोसावी, योगेंद्र गिरासे, विजय नाईक, दिनेश मोहिते, पंढरीनाथ पाटील, डिगंबर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, डॉ़ सपना अग्रवाल, नगरसेविका संगिता सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता़
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिले़ निवेदनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अवकाळीमुळे नुकसानग्रस्तांना २५हजार रुपये हेक्टरी व फळबागांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती़ परंतू प्रत्यक्षात आठ हजार पेक्षा एका रुपयाचीही अधिक मदत दिलेली नाही़ सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करु अशा घोषणा करुनही आश्वासन पाळले नाही़ तसेच या सरकारच्या काळात हिंगणघाटसारख्या गंभीर घटना घडून महिलांवरचे अत्याचारही वाढले असल्याचे सांगून घोषणाबाजी केली़
दरम्यान अक्कलकुवा येथे प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांच्यासह मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले़ पाडवी यांनी तहसील कार्यालयात जाऊन मागण्यांचे निवेदन दिले़
तळोदा येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत, तालुका अध्यक्ष यशवंत पाडवी, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, प्रा़ विलास डामरे, जिल्हा युवा उपाध्यक्ष आनंद सोनार, अनुपकुमार उदासी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ कलाल, भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी, तालुका अध्यक्ष यशवंत पाडवी, बळवंत पाडवी, शिरीष माळी, दीपक चौधरी, नगरसेवक योगेश पाडवी, नगरसेवक रामा ठाकरे, पंचायत समिती सदस्य विजय राणा, राजू पाडवी, दाज्या पावरा, रसीलाबाई देसाई, भारती कलाल, रसिकलाल वाणी, राजू पाडवी, गोकुळ मिस्तरी, लता शुक्ला यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला़
शहादा तहसील कार्यालयामोर भाजपचे शहादा शहराध्यक्ष अतुल जयस्वाल, पालिका गटनेते प्रा. मकरंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनराज पाटील, पंचायत समिती सदस्य गणेश पाटील, हेमराज पवार, दिनेश खंडेलवाल, संतोष वाल्हे, संजय साठे, यशवंत चौधरी, संजय चौधरी, लक्ष्मण बढे, विनोद जैन, जयेश देसाई यांच्यासह महिला आघाडीच्या प्रा. कल्पना पंड्या, अनामिका चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी मंडळ अधिकारी अमृतकर यांनी निवेदन स्वीकारले.

Web Title: Elgar agitation of BJP across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.