बंधारफळी येथे वीज उपकेंद्राचा भुमिपूजन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:37 PM2018-02-20T12:37:46+5:302018-02-20T12:38:24+5:30

Electricity sub-station's groundwork program at Bamberfarli | बंधारफळी येथे वीज उपकेंद्राचा भुमिपूजन कार्यक्रम

बंधारफळी येथे वीज उपकेंद्राचा भुमिपूजन कार्यक्रम

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : बंधारफळी ता़ नवापूर येथे उभारण्यात येणारे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना निर्माण होणा:या वीजेच्या समस्येपासून सुटका होईल असा विश्वास खासदार डॉ. हीना गावीत यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
एकात्मिक उर्जा विकास योजनेअंतर्गत बंधारफळी येथे वीज उपकेंद्राचे भुमिपूजन खासदार डॉ़ हीना गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ़ विजयकुमार गावीत होते. यासोबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस एजाज शेख, कुश गावीत, सविता जयस्वाल, बंधारफळी गावाचे सरपंच रामु गावीत, प्रदीप वळवी, घनश्याम परमार, जाकिर पठाण आदी उपस्थित होते.
महावितरणच्या उपविभागातील ग्रामीण भागात अद्यापही वीज समस्या कायम आहे. अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. नवापूर तालुक्यातील बंधारफळी येथे वीज उपकेंद्रची मागणी करण्यात आली होती. कमी दाबाच्या वीज पुरवठय़ामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. समस्या दुर व्हावी यासाठी अनेक वेळा मोर्चे काढण्यात आल़े निवेदन देण्यात आली होती. त्याअनुशंगाने उपकेंद्र मंजूरही करण्यात आले होत़े परंतु यासाठी जमीन उपलब्ध होत नसल्याने थोडा विलंब झाल्याची माहिती देण्यात आली.
नवापूर तालुक्यातील आदिवासी पाडय़ातील भागात मागणीपेक्षा अत्यल्प वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे सातत्त्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारातही वाढ झाली आह़े सर्वसामान्य जनता, शेतकरी, मजूर, कामगार, व्यापारी, विद्यार्थी व कर्मचारी सर्वानाच विजेच्या लपंडावाचा फटका बसत होता.
कमी दाबाच्या वीजपुरवठय़ामुळे घरगुती उपकरणेही नीट काम करीत नव्हती. अनेकदा उपकरणे निकामीही झाली असल्याच्या व्यथा उपस्थित ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आल्या़ या समस्या सोडवण्यासाठी बंधारफळी गावाच्या शिवारात विद्युत उपकेंद्र निर्माण करण्यात येत असल्याचे डॉ. हिना गावीत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीज वितरण कंपनीचे अभियंता चव्हाण यांनी केले.

Web Title: Electricity sub-station's groundwork program at Bamberfarli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.