शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

चिंचपाडा रुग्णालयास वीजतारांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:12 PM

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : मानवी जीवनाला आधारभूत ठरणाऱ्या चिंचपाडा ता. नवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातून वीजेच्या तारा ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : मानवी जीवनाला आधारभूत ठरणाऱ्या चिंचपाडा ता. नवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातून वीजेच्या तारा टाकण्यात आल्या आहे. परंतु त्या लोंबकळल्याने संपूर्ण आरोग्य केंद्रासह जीवाच्या आकांताने उपचारासाठी येणाºया रुग्णांनाही धोका निर्माण झाला आहे.नवापूर तालुक्यातील १५ पेक्षा अधिक गावांमधील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या, महिला व बालकांनाही आवश्यक त्या योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी चिंचपाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या रुग्णालयामार्फत आरोग्याच्या प्राथमिक सुविधा पुरविल्या जात आहे, तर महिला व बाल विकास विभागांर्तगत गरोदर, स्तनदा माता व पाच वर्षाखालील लाभार्थी बालकांना विविध योजनांचा लाभही दिला जातो. त्यामुळे हे रुग्णालय या १५ गावांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. परंतु या रुग्णालयाच्या आवारातून वीज वितरणमार्फत वीजेच्या तारा टाकण्यात आल्या आहे. या विजतारा रुग्णालय परिसरात अनेक महिन्यांपासून लोंबकळत आहे. या तारा दुरुस्तीकडे वीज वितरण यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे संपूर्ण रुग्णालयाला धोका निर्माण झाला आहे. पर्यायाने तेथे उपचारासाठी येणाºया रुग्णांचा जीवही धोक्यात असल्याचे नागरिकांकडून म्हटले जात आहे.अशा संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी वीज वितरणमार्फत या तारांची पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा निदान त्यांची दुरुस्ती तरी करण्यात यावी, अशी मागणी रुग्ण, रुग्णांचे पालक, रुग्णालयातील कर्मचारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.वीज प्रवाह बंद करीत फडवला जातो ध्वजरुग्णालयाच्या आवारातून गेलेल्या वीजतारा रुग्णालयासाठी तयार करण्यात आलेल्या झेंडावंदनाच्या खांब्याला लागून आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी वीज खंडीत केली जात नसल्याने हा खांब्याचा रुग्णालयाच्या आवारात जाणाºया प्रत्येक व्यक्तीला नेहमीच धोका निर्माण झाला आहे. झेंडावंदनाच्या कार्यक्रम राहिल्यास त्या तारांमधील वीज प्रवाह बंद करण्यात येतो. ही बाब प्रशासनासह नागरिकांसाठी देखील एक मोठी शोकांतिका ठरत आहे.