पोल अभावी लाकडांद्वारे घेतली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 01:22 PM2020-02-27T13:22:53+5:302020-02-27T13:23:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी भागसरी व खोंडामळी भागातील शेतकऱ्यांना वीज मिटर देण्यात ...

Electricity derived from wood due to poles | पोल अभावी लाकडांद्वारे घेतली वीज

पोल अभावी लाकडांद्वारे घेतली वीज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी भागसरी व खोंडामळी भागातील शेतकऱ्यांना वीज मिटर देण्यात आले. परंतु वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना खांबच देण्यात आले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी लाकडाच्या साहाय्याने विहिरींपर्यंत वीज घेतली आहे. ही पद्धत शेतकºयांसाठी धोक्याची ठरते.
नंदुरबार तालुक्यातील भागसरी व खोंडामळी शिवारात शेती असलेल्या श्ेतकºयांना वीज वितरणमार्फत मिटर देण्यात आले. परंतु मुख्य वीजवाहिन्यांपासून वीज घेण्यासाठी त्यांना खांबच उपलब्ध करुन देण्यात आले नाही. वीज वितरणमार्फत खांब उपलब्ध होत नसल्याने खांबअभावी रब्बी हंगामातील पिके धोक्यात येऊ नये, यासाठी शेतकºयांकडून पर्यायी व्यवस्था महणून लाकडी खांबांच्या माध्यमातून वीज विहिरी व कुपनलिकांपर्यंत घेण्यात आली आहे. वीज वितरणने खांब उपलब्ध करुन देण्याबाबत या शेतकºयांच्या समकस्यांकडे लक्ष दिले नसल्याने पर्यायी व्यवस्था केली. परंतु ही पद्धत धोक्याची ठरत आहे.


शेतात नेहमीच ओलावा राहत असतो. तर ओलव्याच्या ठिकाणी वीजप्रवाह उतरण्याचे प्रकार शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. शेतातील ओलावा शिवाय लाकडी खांब यामुळे वीज प्रवाह उतरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. हे संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज वितरणकडून या शेतकºयांना खांब उपलब्ध करुन देत सहकार्य करण्याची गरज आहे.

Web Title: Electricity derived from wood due to poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.