शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
2
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
3
कपिल शर्माला टक्कर द्यायला येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
4
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
5
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
6
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
7
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
8
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
9
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
10
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
11
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
12
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
13
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
14
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
15
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
16
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
17
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
18
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
19
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
20
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

मुदत संपणा-या ८७ ग्रामपंचायतीत निवडणूका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:34 AM

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जुलै ते डिसेंबर २०२० या काळात मुदत संपणा-या जिल्ह्यातील ४९ आणि मार्च महिन्यात ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जुलै ते डिसेंबर २०२० या काळात मुदत संपणा-या जिल्ह्यातील ४९ आणि मार्च महिन्यात स्थगित करण्यात आलेल्या ३८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम लागू होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या १० डिसेंबरपर्यंत अंतिम करुन सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये धडगाव तालुक्यातील १६, नवापूर १४, शहादा ५ तर तळोदा तालुक्यातील ३ ग्रामपंचातयींचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. राज्यात स्थिती सामान्य होत असल्याने या स्थगित केलेल्या निवडणूका थेट न घेता  त्यांचाही  मतदार याद्यांचा कार्यक्रम घेण्याचे आयोगाने ठरवले आहे.  दरम्यान जिल्ह्यात  ते डिसेंबर या काळात मुदत संपणा-या एकूण ४९ ग्रामपंचायती आहेत. यात अक्कलकुवा एक, नंदुरबार २२, शहादा २२ तर तळोदा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये एक डिसेंबर रोजी प्रारूप मतदार याद्यांचे प्रकाशन होणार आहे. एक ते सात डिसेंबर या काळात हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. तर १० डिसेंबर रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमानंतर लागलीच ग्रामपंचायतींचे निवडणूक वेळापत्रक घोषित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाकडून कामकाजाला गती देण्यात आल्याची माहिती आहे.