लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा वकील संघाच्या निवडणूकीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली़ सभेत वकील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी कमलाकर एच़सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ उपाध्यक्षपदी मोहम्मद नबा पठाण, सचिवपदी समीर कुलकर्णी यांची तर सहसचिवपदी शारदा बी़पवार यांची निवड जाहीर करण्यात आली़ सभेत प्रारंभी सचिव समीर कुळकर्णी यांनी सभेचे इतिवृत्त वाचून दाखवल़े यानंतर 2019-20 या वर्षासाठी नूतन अध्यक्ष व कार्यकारिणी निवड करण्यासंबधी चर्चा करण्यात आली़ निवडणूक अधिकारी म्हणून अॅड़ प्रशांत चौधरी यांची निवड झाली़ यानंतर संघाच्या सदस्यांमधून अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांसाठी नामांकन मागवण्यात आल़े अध्यक्षपदासाठी कमलाकर सावळे, उपाध्यक्ष मोहम्मद पठाण व सचिव कुलकर्णी, सहसचिव पवार यांची बिनविरोध निवड झाली़
नंदुरबार जिल्हा वकील संघाची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 12:41 IST