शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक पुढे ढकलल्याने खर्च वाढला : तळोदा पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:20 IST

तळोदा : पालिका निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांना प्रचार करण्यास चार दिवस जास्त मिळाले. त्यामुळे उमेदवारांचा खर्चही वाढला. निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने आणखी चार दिवस प्रचार यंत्रणा खेचून नेण्याचे दिव्य सर्वच उमेदवारांना पार पाडावे लागत आहे.निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, निवडणुकीसाठी नऊ प्रभागाकरीता शहरात 35 मतदान केंद्र ठेवण्यात ...

तळोदा : पालिका निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांना प्रचार करण्यास चार दिवस जास्त मिळाले. त्यामुळे उमेदवारांचा खर्चही वाढला. निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने आणखी चार दिवस प्रचार यंत्रणा खेचून नेण्याचे दिव्य सर्वच उमेदवारांना पार पाडावे लागत आहे.निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, निवडणुकीसाठी नऊ प्रभागाकरीता शहरात 35 मतदान केंद्र ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रावर 349 कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली असून, निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे याची दक्षता घेण्यासाठी दोन आचार संहिता पथक कार्यरत आहेत. त्यांच्या सोबत दोन छायाचित्रण करण्यासाठी दोन व्हीडीओ ग्राफर देण्यात आले आहे. प्रत्येक कार्यक्रम, सभा, रॅली व निवडणूक कार्यक्रमाचे चित्रण करण्यात येत आहे.मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर निवडणूक कर्मचा:यांचे काम नियमानुसार व बिनचूक होण्याच्या दृष्टीने 28 नोव्हेंबर 2017 व 5 डिसेंबर 2017 रोजी दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. ए.व्ही.एम. मतदान यंत्र, बॅलेट             युनीट, कंट्रोल युनीट आदी 13 डिसेंबर रोजी उमेदवार त्यांचे समर्थक यांच्या समोर सील करण्यात आले आहे. 16 डिसेंबर रोजी सर्व निवडणूक कर्मचा:यांना तिसरे प्रशिक्षण देवून मतदान साहित्य वाटप केले जाणार आहे. मतदान केंद्रावर मतदान          साहित्य पोहोचविण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहन व्यवस्था करून          वाहन अधिग्रहित करण्यात आली आहेत.मतमोजणी 18 डिसेंबर रोजी सकाळपासून सुरू होणार असून, मतमोजणीची व्यवस्था मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत करण्यात आली आहे. त्यासाठी 30 टेबलांवर 30 कर्मचारी मतमोजणीचे काम करतील. पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी विनय गौडा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार योगेश चंद्रे, पालिका मुख्याधिकारी जनार्दन पवार हे काम पाहात आहेत. पालिकेचे कर्मचारी विजय सोनवणे, राजेंद्र सैंदाणे, प्रशांत ठाकूर, दिलीप वसावे, अनिल माळी हे निवडणूक शाखेत काम पाहात आहेत.