हिंगणी गावात प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:45 PM2020-06-02T13:45:37+5:302020-06-02T13:45:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील हिंगणी येथील ४९ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने त्याच्या परिवारातील व नातेवाईक ...

Effective measures started by the administration in Hingani village | हिंगणी गावात प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना सुरू

हिंगणी गावात प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : शहादा तालुक्यातील हिंगणी येथील ४९ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने त्याच्या परिवारातील व नातेवाईक अशा २८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी १५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी १४ जणांचे अहवाल रविवारी रात्री निगेटीव्ह तर मयताच्या २९ वर्षीय पुतण्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली. सोमवारी पुन्हा २८ पैकी १४ जणांचे स्वॅब घेण्यात येतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे हिंगनी गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
हिंगणी येथील कोरोनाने मृत झालेली व्यक्ती १५ मे रोजी मुंबईहून आपल्या मूळगावी हिंगणी येथे आला होता. तो तºहाडी व वरुळ, ता.शिरपूर येथे खाजगी डॉक्टरांकड़े तपासणी करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याचा पुतण्या २९ वर्षीय पॉझिटीव्ह रुग्णही सतत आठ दिवस त्याच्यासोबत होता. तसेच मृताच्या अंत्ययात्रेतही तो सामील झाला होता. मयत झालेली व्यक्ती मुंबईहून आल्यानंतर मित्र परिवारच्याही संपर्कात आलेली होती. तसेच जिल्ह्याबाहेर जाऊन खाजगी डॉक्टरांकड़े उपचार केले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून गावातील मित्रांना व दोन खाजगी डॉक्टर, एक लॅब टेक्नीशियन अशा सहा जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय मोहने यांच्या मार्गदशार्नाखाली आरोग्य विभागाचे चार पथक नियुक्त करुन गावात आरोग्य पथकामार्फत तपासणी सुरु करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत गावात फवारणी व सॅनिटायझर वाटप करण्यात येऊन उपाययोजना करण्यात आली.
प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय मोहने, सारंगखेड्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सरपंच सुनील पाटील, पोलीस पाटील वाल्मिक दाभाडे, ग्रामसेवक बी.डी. तिरमले, तलाठी एस.आर. साळवे हे परिस्थितीवर नियत्रंण ठेऊन आहेत. गाव पूर्ण लॉकडाऊन करण्यात येऊन पोलीस प्रशासनाकडून गावात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: Effective measures started by the administration in Hingani village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.