रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी परिसरात बिबटय़ाच्या वावरामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आह़े त्याच प्रमाणे मजुरांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झालेले आह़े वनविभागाने बिबटय़ाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आह़ेगुरुवारी रांझणी गावाजवळील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या महेंद्र दामोदर भारती यांच्या शेतात बिबटय़ाचे केवळ 20 फूट अंतरावरुन दर्शन झाल़े बिबटय़ा दिसताच त्यांनी प्रसंगावधान राखत आपल्या जवळ असलेला मका मोजणीसाठी आणलेला पत्री डबा जोरजोराने वाजविण्यास सुरुवात केली़ तसेच आपल्या नातेवाईकांनाही भ्रमणध्वनी करुन घटनेची माहिती दिली़ त्यानंतर भारती यांच्या पत्नी रोहिणी भारती यांनी गावातील युवकांना घटनेची माहिती दिली़ त्यानुसार ग्रामस्थ घटनास्थळी जाण्यासाठी निघाले असता तेथे बिबटय़ा दिसून आला नाही़ बिबटय़ाने इतरत्र पोबारा केल्याचा अंदाज ग्रामस्थांकडून बांधण्यात आला़ दरम्यान, सध्या परिसरात मका कापणी, मळणी सुरु असून रात्रीच्या वेळेस कुणीही मजूर राखण करायला मिळत नसल्याने स्वता शेतमालक महेंद्र भारती आपल्या सहका:यांसोबत शेतात आले होत़े मका कापणी केलेले क्षेत्र असल्याने कुत्रे अचानक भुंकू लागल्याने भारती यांनी त्या दिशेने पाहिले असता बिबटय़ा समोर असल्याचे दिसून आल़े या घटनेने रांझणी गावासह परिसरात खळबळ माजली असून शेतकरी व मजूर धास्तावले आह़े दरम्यान, रांझणी गावाजवळील जलकुंभालगत असलेली हाळ यामुळेही बिबटय़ा रात्रीच्या वेळेस गावाकडे आला असावा असा अंदाज आह़े तसेच गावातील शेळ्या, गुरांना सावज बनवण्यासाठी गावाकडे वळला असावा असाही अंदाज आह़े
रांझणी परिसरात बिबटय़ा दिसल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:32 IST