शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

सरदार सरोवर प्रकल्पात पाणी नसल्याने मान्सून फेस्टीवल रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 18:34 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रचंड घाईगर्दी करून गुजरात सरकारने सरदार सरोवर प्रकल्पावरील गेट बसवून प्रकल्पाची उंची 138 मिटर्पयत पुर्ण केली असली तरी गेल्या दोन वर्षात पाणीच नसल्याने हा प्रकल्प अद्यापही भरलेला नाही. परिणामी या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने सुरू केलेला मान्सून फेस्टीवल सलग दुस:यावर्षी रद्द करावा ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रचंड घाईगर्दी करून गुजरात सरकारने सरदार सरोवर प्रकल्पावरील गेट बसवून प्रकल्पाची उंची 138 मिटर्पयत पुर्ण केली असली तरी गेल्या दोन वर्षात पाणीच नसल्याने हा प्रकल्प अद्यापही भरलेला नाही. परिणामी या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने सुरू केलेला मान्सून फेस्टीवल सलग दुस:यावर्षी रद्द करावा लागला आहे. दरम्यान, जगातील सर्वात उंच स्टय़ॅचू उभारण्याचे काम या ठिकाणी अंतिम टप्प्यात असून 31 ऑक्टोबरला त्याचे लोकार्पण करण्यासाठी तयारी सुरू आहे.महाकाय सरदार सरोवर प्रकल्प हा सुरूवातीपासूनच या ना त्या कारणाने चर्चेत राहिला आहे. या प्रकल्पामुळे लाभहाणीचे समिकरण तथा पर्यावरणाची हाणी आणि पुनर्वसन हे विषय जागतिक स्तरावर गाजले. परंतु सर्व संघर्षानंतर व सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा अधीन राहून हा प्रकल्प अखेर पुर्ण रेटला आहे. या प्रकल्पाची उंची कमी करण्याबाबत नर्मदा बचाव आंदोलनाने लढा दिला. पण, त्यानंतरही प्रकल्पाची उंची 138 मिटर्पयत पुर्ण करण्यात आली आहे. पण धरणाची उंची पुर्ण झाल्यापासून अर्थात धरणावरील गेट बसविल्यापासून हा प्रकल्प मात्र अद्यापही पुर्ण भरलेला नाही. गेल्या वर्षी पाऊस नसल्याने हा प्रकल्प जवळपास दहा मिटरने खाली होता. यावर्षी देखील या प्रकल्पात आतार्पयत 121.67 मिटरपर्यतच पाणीसाठा झाला आहे. अजून 16 मिटरपेक्षा अधीक हा प्रकल्प रिक्त आहे. प्रकल्प भरला नसल्याने या ठिकाणी धरणावरून फेसाळणा:या धबधब्याचे मनोहारी दृष्य गेल्या दोन वर्षापासून लुप्त झाले आहे. यापूर्वी या धरणाची उंची 121.85 मिटर असतांना पावसाळ्यात धरणाच्या भिंतीवरून पाणी कोसळत होते. अक्षरश: नायजेरिया  धबधब्याची प्रचिती येथे पर्यटकांना येत होती. त्यामुळे पर्यटकांची गर्दीही प्रचंड    राहत होती. त्याची नोंद घेत गुजरात सरकारनेही 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर  असा महिनाभर मान्सून फेस्टीवलचे आयोजन सुरू केले होते. पण दोन वर्षापासून हा फेस्टीवल रद्द झाला आहे.पाण्यामुळे फेस्टीवलच रद्द झाला नाही तर प्रकल्पाची वीज निर्मिती देखील थांबली आहे.स्टय़ॅचू ऑफ युनिटी ठरणार लक्षवेधीसरदार सरोवर प्रकल्पा जवळच स्टय़ॅचू ऑफ युनिटी अर्थात सरदार पटेल यांचा भव्य 182 मिटर उंचीचा पुतळा उभारण्यात येत आहे. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचा धर्तीवर विकसीत करण्याचे काम गुजरात सरकारने सुरू केले आहे. या पुतळ्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून साधारणत: येत्या 31 ऑक्टोबरला सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी हा स्टय़ॅचू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे प्रय} सुरू आहेत. या स्टय़ॅचूसाठी सर्व भाग ब्रांझपासून तयार करण्यात आले असून ते चीनमधून तयार करून येत आहेत. एक एक भाग आणल्याननतर तो जोडला जात आहे. या स्टय़ॅचूच्या ठिकाणी एखाद्या महाबेटासारखे वातावरण निर्माण करून त्या ठिकाणी बोटींग व अन्य सुविधाही करण्यात येणार आहेत. याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी हॉटेलही उभारली जात आहे. बडोदा ते सरदार सरोवर प्रकल्पार्पयत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. शिवाय विमानतळही उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे एकुणच हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या दृष्टीनेच विकसीत होत आहे. सहाजिकच स्टय़ॅचूच्या लोकार्पणानंतर सध्या ओस पडलेली पर्यटकांची गर्दी पुन्हा या ठिकाणी वाढणार आहे.हा स्ट्यॅचू आकारास आल्यानंतर जगातील सर्वाच उंच स्ट्यॅचू ठरणार आहे. सध्या सर्वात उंच स्टयॅचू चिनमधील स्प्रिंग टेम्पल बुद्धा हे आहे. त्याची उंची 153 मिटर आहे. त्या पाठोपाठ जपानमधील उशीकु दाईबुत्सू याची उंची 120 मिटर आहे. रशियातील द मदरलॅन्ड कोल्स याची उंची 85 मिटर आहे तर  युएसए  मधील स्टय़ॅचू ऑफ लिबर्टीची उंची 63 मिटर आहे. त्यामुळे स्टय़ॅचू ऑफ लिबर्टी हे 182 मिटर उंचीचे जगातील सर्वात उंच स्टय़ॅचू ठरणार आहे. या स्टय़ॅचूच्या ठिकाणी एकाचवेळी 15 हजार पर्यटक थांबू शकतील. एका वेळी 200 लोकं जावू शकतील.