शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

बाजारपेठेअभावी नंदुरबार जिल्ह्यात हळद उत्पादक संकटात

By admin | Updated: April 12, 2017 13:27 IST

तळोदा तालुक्याच्या विविध भागात शेतक:यांनी लागवड केलेल्या हळदचे उत्पादन येण्यास प्रारंभ झाला आह़े

 विक्री केंद्राची गरज : तळोदा तालुक्यात एकरी 100 क्विंटल उत्पादन  

बोरद,दि.12- तळोदा तालुक्याच्या विविध भागात शेतक:यांनी लागवड केलेल्या हळदचे उत्पादन येण्यास प्रारंभ झाला आह़े एकरी 100 क्विंटल उत्पादन आल्याने शेतक:यांना दिलासा मिळाला होता़ मात्र हा दिलासा अल्प ठरला असून दर घसरण आणि खरेदी केंद्राचा अभाव यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत़ 
प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात लागवड होणारी हळद, गेल्या काही वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यात लागवड करण्यात येत आह़े साधारण एप्रिल महिन्यात येणा:या या उत्पादनामुळे शेतक:यांना खरीप हंगामापूर्वी शेत मोकळे करता येत़े हळद लागवडीमुळे जमिनीची गुणप्रत वाढत असल्याने बहुतांश शेतकरी आता हळद लागवड करू लागले आहेत़ मात्र नंदुरबार जिल्ह्यातून हळद विक्रीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठ गाठावी लागत असल्याने शेतक:यांना हाती आलेल्या उत्पादनातून नफ्याचे गणित साधणे शक्य होत नसल्याने जिल्ह्यातच खरेदी केंद्रांची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा हळद उत्पादक शेतक:यांची आह़े  
क्विंटलमागे 10 हजार रुपये दर
तळोदा तालुक्यात गेल्या वर्षापासून 20 हेक्टरवर हळद लागवड केली होती़ या हळद लागवडीचे उत्पादन मार्च महिन्याच्या अखेरीपासून एप्रिलच्या मध्यार्पयत हाती येत़े साधारण खरीप हंगामाच्या सुरूवातीला मे महिन्याच्या अंतिम आठवडय़ापासून हळद लागवड करण्यात येत़े एकरी 60 हजार ते एक लाख रूपयांर्पयत खर्च येणा:या हळदीचे उत्पादन हे एकरी क्विंटलपेक्षा अधिक येणार असल्याने शेतकरी आर्थिक गुंतवणूक करत आहेत़ मात्र या गुंतवणूकीला शासकीय धोरणांच्या उदासिनतेचा फटका बसत आह़े  
तळोदा तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यात लागवड होणा:या हळद उत्पादनाला बाजारपेठ याच जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची गरज आह़े पश्चिम महाराष्ट्रात पाठवण्यात येणा:या हळदीच्या वाहतूकीसाठी एका क्विंटलमागे 180 ते 200 रूपये खर्च अपेक्षित असतो़ आधीच हळद काढणी आणि बॉईलिंग या प्रक्रियेत लागणा:या मजूरीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आह़े एवढा खर्च करूनही शेतक:यांना क्विंटलमागे 6 हजार रूपये दर मिळत आह़े  या हळदीला 10 हजार रूपये क्विंटल दर देण्याची अपेक्षा तालुक्यातील हळद उत्पादकांची आह़े 
तळोदा तालुक्यातील मोड, बोरद परिसरात यंदा सर्वाधिक हळदीचे उत्पादन घेतले जात आह़े अनेकांची हळद सुकवण्याची प्रक्रिया सुरू आह़े शेतशिवारात लागवड केल्यानंतर वर येणा:या या पिकाला रानडुक्कर किंवा इतर पशु खात नसल्याने ते सुरक्षित राहत़े या पिकावर केवळ करपा नावाचा एकमेव रोग अपायकारक ठरत असल्याचे शेतक:यांनी सांगितल़े  लागवड खर्च कमी अधिक प्रमाणात वाढत असल्याने शेतकरी या पिकावर भर देत आहेत़ जिल्ह्यात वाढत असलेल्या या हळदीचे उत्पादन शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा नाफेड सारख्या संस्थेच्या माध्यमातून खरेदी करण्याची अपेक्षा शेतक:यांनी व्यक्त केली आह़े 
तळोदा तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीपासून साधारण 35 हेक्टरवर हळद लागवड करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत़ 15 हेक्टरने लागवड वाढणार असल्याने कृषी विभागाने शासनाकडे खरेदी केंद्र आणि दरवाढ याबाबत आतापासून पाठपुरावा केल्यास येत्या वर्षात त्यांना यश मिळणार आह़े (वार्ताहर)