शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

दुष्काळ झळांमुळे वरूळ गाव पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:19 IST

लहान शहादे : नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागल्याने निर्माण झालेल्या दुष्काळ झळांमधून सावरण्यासाठी मजूर स्थलांतराचा मार्ग निवडत आहेत़ दरदिवशी स्थलांतराचा हा वेग वाढत असून गावे ओस पडत आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या वरूळ गावात अशीच भिषण स्थिती असून 690 लोकसंख्येच्या या गावातून 300 जण गुजरात राज्यात रवाना ...

लहान शहादे : नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागल्याने निर्माण झालेल्या दुष्काळ झळांमधून सावरण्यासाठी मजूर स्थलांतराचा मार्ग निवडत आहेत़ दरदिवशी स्थलांतराचा हा वेग वाढत असून गावे ओस पडत आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या वरूळ गावात अशीच भिषण स्थिती असून 690 लोकसंख्येच्या या गावातून 300 जण गुजरात राज्यात रवाना झाल्याची माहिती आह़े 100 टक्के आदिवासी बहुल वस्ती असलेल्या वरूळ गावात यंदाही  दुष्काळी स्थिती असल्याने मजूरांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े एकीकडे दुष्काळी स्थितीमुळे शेतशिवार ओस पडले असताना गावात मिळणारे पिण्याचे पाणी आणि इतर सुविधांचीही दैना झाली आह़े  रोजगारासोबतच दर दिवशी भेडसावणा:या मूलभूत समस्यांना कंटाळून ग्रामस्थ घरादाराला टाळे ठोकून  गुजरात राज्याचा रस्ता धरत असल्याचे चित्र येथे राजरोस नजरेस पडत आह़े यातून दस:यानंतर रिते होणारे गाव यंदा दस:यापूर्वीच भकास दिसू लागले आह़े उर्वरित ग्रामस्थही स्थलांतराच्या तयारीत आहेत़ यामुळे येत्या काळात या गावात केवळ वृद्ध आणि निवडक शेतकरी कुटंबांसह रहिवास करणार असल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव, समशेरपूर, शिंदे, लहान शहादे, पळाशी या मोठय़ा गावांमध्ये शेतीकामांसाठी मजूर पुरवठा करणारी वसाहत म्हणून वरूळ गावाचा लौकिक आह़े गावात मोजक्याच जणांकडे स्वत:ची शेती आह़ेसंपूर्णपणे कोरडवाहू असलेल्या शेतीत कृषीपंप बसवून सिंचन करण्याची ऐपत नसल्याने आणि शासनही कोरडवाहू शेती कसरणा:यांचे ऐकत नसल्याने वर्षानुवर्षे दुस:याच्या शेतात मजूरी करण्याचा नाईलाज येथील ग्रामस्थांचा आह़े यंदा जून महिन्यापासून पावसाने रडतखडत हजेरी लावल्याने आठवडय़ातून चार दिवस काम आणि तीन दिवस आराम अशी स्थिती येथील मजूरांची होती़ यातील काही जणांनी नंदुरबार आणि लगतच्या निझर परिसरातील लघुउद्योजकांकडून मजूरीसह विविध कामे करून रोजगार कमावण्याचा प्रयत्नही केला़ परंतू तो अपुरा पडला़ परिणामी गावातून गेल्या 15 दिवसांपासून ग्रामस्थांचे लोंढेच गुजरातकडे सरकू लागले आहेत़ बारडोली आणि मढी साखर कारखान्यात ऊस तोड तसेच सौराष्ट्र भागात कापूस वेचणीसाठी शेतक:यांकडून बोलावणे येण्यापूर्वीच अनेकजण रवाना झाले आहेत़  साधारण 400 ते 600 रूपये प्रतिदिवस रोजगार आणि जेवण यासह कुटूंबासाठी राहण्याची जागा या अटीवर ही कुटूंबे रवाना होत असल्याने घरांना कुलूप लागत आहेग़ावात ज्या लोकांकडे स्वत:ची गुरे आहेत तेच सध्या गावात दिसून येत आहेत़ काहींकडे दुभती जनावरे असली तरी त्यांना चारा नसल्याने सुरु असलेला छोटा दुग्धव्यवसायही चा:याअभावी रसातळाला जात आह़े गावाला पाणी पुरवठा करणारी योजना येत्या महिनाभरात आटून भटकंती होणार असल्याने पुढे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े गावात पाण्यासाठी इतर स्त्रोत म्हणून टाकण्यात आलेल्या हातपपांची स्थिती दयनीय आह़े गावातून स्थलांतर करणा:या ग्रामस्थांना घेण्यासाठी यंदाही ठेकेदारांची वाहने येत असून मजूर त्यांचे कुटूंबिय आणि त्यांचा जुजबी सामान घेत रवाना होत आहेत़ मजूरांच्या काही जत्थ्यांकडून भाडोत्री वाहने केली जात आहेत़ स्थलांतरामुळे गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्याथ्र्याच्या संख्येवरही परिणाम झाला असून याठिकाणी दरदिवशी विद्यार्थी संख्या घटत असल्याची माहिती देण्यात आली आह़े यातून शिक्षकांच्या चिंता वाढल्या आहेत़