सुविधेअभावी प्रवाशांच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:39 AM2019-10-17T11:39:56+5:302019-10-17T11:40:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण करण्यात आलेली पाणपोई गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडली आह़े यामुळे ...

Dryness of travelers' throat due to lack of convenience | सुविधेअभावी प्रवाशांच्या घशाला कोरड

सुविधेअभावी प्रवाशांच्या घशाला कोरड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण करण्यात आलेली पाणपोई गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडली आह़े यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून पाणी खरेदी करुन प्यावे लागत आह़े याकडे परिवहन महामंडळाने लक्ष द्यावे यासाठी नागरिकांनी पाठपुरावा केला होता़  
नंदुरबार जिल्ह्याचा विकास व प्रवाशांचा वाढता विस्तार लक्षात घेत आठ वर्षापूर्वी नंदुरबार आगारामार्फत बसस्थानकाचाही विस्तार करण्यात आला. बस्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी प्रवाशाना अपेक्षीत असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी बसस्थानकावर दोन ंठिकाणी नळही बसविण्यात आले होते. परंतु अवघ्या काही वर्षातच तेथील दोन्ही सुविधांची दुरावस्था झाली. ही सुविधा अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे तीन राज्यातून येणा:या प्रवाशांना पाण्याअभावी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकावर पहाटे पाच वाजेपासून रात्री नऊ वाजेर्पयत प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. त्यांना पिण्याच्या पाण्याची नितांत गरज  भासते. बसस्थानकाजवळ कुठलीही पाण्याची सार्वजनिक व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी केवळ बाटलीच्या  पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यांना यासाठी 20 रुपयाचा भरूदडही सहन करावा लागत आहे. या बसस्थानकावर दैनंदिन येणा:या बसेसची संख्या अन्य बसस्थानकांच्या तुलनेत सर्वाधिक असून प्रवाशांची संख्याही अधिक आहे. 
पाण्याच्या असुविधेला परिवहन महामंडळ जबाबदार आहेत, तेवढेच प्रवासी तथा जनतेला देखील जबाबदार धरले जात आहे. मुद्दा सार्वजनिक व्यवस्थेचा असला तरी प्रवाशांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी परिवहन महामंडळाला घ्यावी लागणार आहे. तर बसस्थानकावरील सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेत तेथील सुविधा अबाधित ठेवण्याची देखील आपण प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार तातडीने  सुविधा करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून  करण्यात येत आहे. प्रवाशांच्या या मागणीची  परिवहन महामंडळ कितपत दखल घेते, याकडे या बसस्थानकावरुन प्रवास करणा:या प्रत्येक प्रवाशांचे लक्ष लागून आहे.
 

Web Title: Dryness of travelers' throat due to lack of convenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.