शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृष्य स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 90 टक्के पीक पाण्याखाली गेले आहेत. शेतांमध्ये कमरेएव्हढे पाणी साचले आहे. अनेक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 90 टक्के पीक पाण्याखाली गेले आहेत. शेतांमध्ये कमरेएव्हढे पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी नाल्यांनी प्रवाह बदलल्याने शेतांनाच नाल्याचे स्वरूप आले आहे. खरीप हंगाम हाताचा गेला असून जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असून पूरपरिस्थिती कमी होऊ लागली आहे.  नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसाचे उशिराने आगमन झाले होते. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवडय़ार्पयत पेरण्या सुरूच होत्या. यंदा खरीप क्षेत्राच्या जवळपास 105 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर अधीक असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. दोन दिवसांपासूनच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांनी प्रवाह बदलल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.90 टक्के पीक पाण्याखालीगेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यातील 90 टक्के भागातील पीक पाण्याखाली गेले आहे. कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी या पिकांना मोठा फटका बसला आहे. सातत्याने तीन ते चार फुटार्पयतच्या पाण्यात पीक राहत असल्यामुळे ते पिवळे पडण्याच्या मार्गावर आहेत. शेतांमधून पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसल्यामुळे पिकं सडण्याच्या मार्गावर आहेत. जे पिकं जेमतेम तग धरतील त्यांची उत्पादन क्षमता देखील कमी होणार आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याच्या स्थितीत आहे.केसाळ अळीनंतर अतिवृष्टीजून ते जुलै महिन्याच्या दुस:या आठवडय़ार्पयत पावसाने ताण दिला होता. यामुळे पिकांवर केसाळ व लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यापासून शेतक:यांनी जेमतेम सुटका करून घेतली तर लागलीच अतिवृष्टीने शेतक:यांना घेरले आहे.हजारो हेक्टर शेतीचे नुकसानजिल्ह्यातील अनेक भागातील नदी, नाल्यांनी आपला प्रवाह बदलला आहे. यामुळे ते पाणी शेतांमध्ये घुसले आहे. परिणामी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी तर शेतांना नाल्याचेच स्वरूप आले आहे. परिणामी अशा भागातील शेतीची सुपिकता नष्ट होण्याची भिती व्यक्त होत आहे. ओला दुष्काळाची स्थितीजिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीचा केवळ 68 टक्के पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती होती. अनेक गावे व शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. अनेक कुटूंबांनी दुष्काळामुळे स्थलांतर देखील केले होते. त्यामुळे यंदा पाऊसपाणी समाधानकारक राहो यासाठी प्रार्थना केली जात होती. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात देखील दुस:या आठवडय़ार्पयत पावसाने ताण दिल्याने जिल्हावासीयांच्या तोंडाचे पाणी पळाले होते. परंतु जुलैच्या शेवटच्या आठवडय़ापासून पावसाने दिलेली सलामी आणि त्यानंतरची पावसाची हजेरी ओव्हरडोस देणारी ठरली. गेल्या दोन आठवडय़ात चार वेळा अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात झाली. विशेषत: घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक राहिल्याने तेथून उगम पावणा:या  व वाहत येणा:या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली. जुन, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ाच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल 55 टक्के अधीक पाऊस झाला आहे. तर चार महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत जवळपास 86 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे. पंचनामे सुरूच..4 व 5 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर शेत शिवारातील पिकांचा पंचनामा करण्याचे काम सुरू झाले होते. परंतु संततधार पावसामुळे ते पुर्ण होऊ शकले नव्हते. आता पुन्हा दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. आधी जेथे 50 टक्केच्या आत नुकसानीचे पंचनामे झाले होते तेथे आता पुन्हा नव्याने पंचनामे करण्याची वेळ येणार आहे. जवळपास जिल्ह्यातील 80 टक्केपेक्षा अधीक भागावर 50 टक्केपेक्षा अधीक नुकसान झाले असून त्यानुसार शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी होत  आहे.