शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

लोणखेडा येथील शिबिरात ४२ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 12:33 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणखेडा येथील किसान उद्योग समूह व योगेश्वर गणेश मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणखेडा येथील किसान उद्योग समूह व योगेश्वर गणेश मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४२ दात्यांनी रक्तदान केले.कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन झाल्यामुळे रुग्णालयात रक्ताची कमतरता जाणवू लागली असून प्रशासनाने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील लोणखेडा येथील किसान उद्योग समूह व योगेश्वर गणेश मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या शिबिरात जमा होणाऱ्या रक्तसाठ्याचा काही भाग कोरोनाजन्य विषाणूबाधीत गरजूंना सुपूर्द करण्यात येणार आहे. शिबिरात ४२ दात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.रक्तदात्यांमध्ये तीन फुटाचे अंतर ठेवून रक्तदान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरासाठी किसान उद्योग समूहाचे किशोर पाटील, किरण पाटील, वासुदेव पाटील, सुनील साळुंखे, गिरधर पाटील, एकनाथ सुतार, गणेश पाटील, खुशाल पाटील, धिरज पाटील, रवीन पाटील, छोटू पाटील, कविता पाटील, मनिषा पाटील, निता पाटील, राहुल राजपूत, प्रशांत पटेल, अविनाश पाटील, सचिन पाटील, जयेश पाटील, कैलास पाटील, विलास पाटील, योगीराज पाटील, जगदीश पाटील आदींनी परिश्रम घेतले. रक्त संकलनासाठी शहादा ब्लॅड बँकेचे नाजीम तेली यांच्यासह त्यांच्या टीमने सहकार्य केले.दरम्यान, शहादा शहरातील ज्या नागरिकांना रक्तदान करावयाचे असेल त्यांनी शहरातील रक्तपेढीत डॉ.नाजीम तेली यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणीनंतरच प्रत्येकाला वेळ दिल्यानुसार रक्तदान घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.