आदेशांचे उल्लंघन करू नका अन्यथा कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:41 PM2020-04-01T12:41:34+5:302020-04-01T12:41:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन न करता घरातच बसून रहावे व प्रशासनास मदत करावी. ठरवून ...

Do not violate orders or take drastic action | आदेशांचे उल्लंघन करू नका अन्यथा कठोर कारवाई

आदेशांचे उल्लंघन करू नका अन्यथा कठोर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन न करता घरातच बसून रहावे व प्रशासनास मदत करावी. ठरवून दिलेल्या वेळेतच अत्यावश्यक सामान घेण्यासाठी घराबाहेर पडावे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिला आहे.
प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी आदींसह कर्मचाऱ्यांचे पथक शहरात गस्त घालून नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करीत आहेत. पहिले दोन दिवस वगळता आता नागरिकांमध्ये हळूहळू प्रशासनाचे म्हणणे रुजत असल्याचे चित्र आहे. भाजीपाला विक्रीसाठीही शहरात ठिकठिकाणी सोय करण्यात आली असून नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.वाघ यांनी केले आहे.
पोलिसांकडून गस्त
संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले असून सकाळी बाजारपेठेत भाजीपाला, दूध, धान्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दिवसभरात पोलिसांकडून वाहनधारकांची चौकशी करून त्यांना माघारी पाठविण्यात आले. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना तंबीही देण्यात आली. दिवसभर पोलिसांकडून शहरात गस्त घालण्यात येत असून काहींना पोलिसांकडून ‘प्रसाद’ही दिला जात आहे. ही कारवाई होऊ नये म्हणून घरी थांबणे योग्य समजावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी केले आहे.
प्रांताधिकाºयांचे आवाहन
शहाद्यातील कष्टकºयांच्या सोयीसाठी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी पुढाकार घेत त्यांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे. रोजंदारीने उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून गिरासे यांनी सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे. शासनाकडून मार्च व एप्रिल महिन्याचे धान्य मिळणार असले तरी सध्या इतर जीवनावश्यक वस्तू देणे आवश्यक आहे. अनेक स्वयंसेवी संघटना मदत करण्यासाठी इच्छुक असून सालदारनगर, शिवाजीनगर यासह इतर गरीब लोकांच्या वस्तीत गरजू कुटुंबांना किमान चार-पाच दिवस जीवनावश्यक वस्तूंची किट देणे योग्य ठरेल. दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संघटनांनी जर किट्स विकत घेऊन जमा केल्यास गरीब वस्तीत नगरपालिका प्रशासनामार्फत वाटप करण्याचे नियोजन करता येईल. नगरपालिकेची टीम तयार करून एका ठिकाणी किट्स जमा करुन स्वयंसेवी संस्थांचे एक दोन प्रतिनिधी व नगरपालिका कर्मचाºयांमार्फत ते वितरीत करता येईल. इच्छुकांनी मदत देण्यासाठी लक्ष्मण कोळी (मो.८३२९८१७०३३), संदीप टेंभेकर (मो.८६६९१३२७२३) व चेतन गांगुर्डे (मो.८२७५५६३९३९) या कर्मचाºयांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Do not violate orders or take drastic action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.