जिल्ह्याच्या वाट्याला आले २९ हजार टन खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:13 PM2020-07-06T12:13:40+5:302020-07-06T12:13:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याला आवश्यक असलेल्या ७० हजार टन युरियापैकी २९ हजार टन युरियाचे दोन रॅक दोंडाईचा ...

The district received 29,000 tons of fertilizer | जिल्ह्याच्या वाट्याला आले २९ हजार टन खत

जिल्ह्याच्या वाट्याला आले २९ हजार टन खत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याला आवश्यक असलेल्या ७० हजार टन युरियापैकी २९ हजार टन युरियाचे दोन रॅक दोंडाईचा येथे पोहोचले आहेत़ यातून उतरवण्यात आलेले खत रविवारी जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाल्याने सोमवारपासून खत टंचाई निकाली निघण्याची चिन्हे आहेत़ मागणीच्या तुलनेत हे खत कमी असले तरी त्याचा योग्य प्रकारे पुरवठा करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने कंबर कसली आहे़
साधारण दोन लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रात यंदा खरीप पेरण्यांचे नियोजन आहे़ त्यानुसार जून महिन्यात पावसाने दिलेल्या हजेरीच्या बळावर ६३ हजार हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ पेरण्यात आलेल्या पिकांना खतांची मात्र आवश्यक असल्याने शेतकरी शहरी भागातील दुकानांमध्ये गर्दी करत होते़ परंतु एप्रिल ते जून या कालावधीसाठी जिल्ह्यात खत कंपन्यांनी केवळ १४ हजार ९०४ टन युरियाचा पुरवठा केला असल्याने टंचाई निर्माण झाली होती़ खत कंपन्यांकडून प्रत्यक्षपणे २४ हजार ६६० टन युरियाचा पुरवठा करणे क्रमप्राप्त असतानाही जिल्ह्यात केवळ १५ हजार टन खत आले होते़ यातून विक्रेत्यांकडून ९ हजार ७५६ टनाची तूट होती़ ही तूट भरुन काढणे आणि नवीन खत मिळवण्यासाठी कृषी विभागाने खत कंपन्यांसोबत संपर्क साधला होता़ केंद्र आणि राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सातपैकी दोन कंपन्यांचे खत सध्या जिल्ह्यासाठी देण्यात आले आहे़ या खताचा पुरवठा रविवारीच जिल्ह्यात सुरू करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे़ दरम्यान शेतकऱ्यांनी गरजेपुरतेच खत घ्यावे यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोमवारपासून कृषी सेवा केंद्राना भेटी देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे़
जिल्ह्यात निर्माण झालेल्या खत टंचाईला लॉकडाऊनमुळे कंपन्यांमध्ये कमी झालेले उत्पादन कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत असून दोंडाईचा येथे आलेल्या रेल्वे रॅकमधून खत उतरवणे आणि जिल्ह्यातील पुरवठादारांच्या वाहनात ते भरुन देणे यासाठी मजूर नसल्याने कामांना विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे़ सोमवारी सकाळी जिल्ह्यातील ५५० पेक्षा अधिक दुकानदारांकडे युरिया उपलब्ध होणार असल्याने त्याचा साठा होणार नाही, यासाठी भरारी पथकेही सातत्याने तपासणी करणार आहेत़

कृषी विभागाने खरीप हंगामासाठी ७० हजार २६० टन युरिया तर ४५ हजार टन मिश्र खतांची मागणी केली होती़ पैकी ४७ हजार ३०० मेट्रीक टन यूरीया तर ४१ हजार टन मिश्र खते जूनपर्यंत प्राप्त होणार होती़ परंतु लॉकडाऊनमुळे उत्पादन घटलेल्या खत कंपन्यांनी जिल्ह्यात २४ हजार ६६० टन युरिया देण्याचे नियोजन केले होते़ परंतु प्रत्यक्षात मात्र १४ हजार ९०५ टन युरिया मिळाला होता़ हा युरिया हातोहात संपल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या रांगा लागत होत्या़ यावर पाठपुरावा केल्यानंतर दोन खत कंपन्यांनी २९ हजार टन युरियाचे दोन रॅक जिल्ह्यासाठी रवाना केले होते़ रविवारी सकाळी हे रॅक दोंडाईचा येथील रेल्वेस्थानकात आले आहेत़ जिल्ह्यात युरियाची पुन्हा टंचाई होवू नये यासाठी शेतकºयांना तूर्तास तीन किंवा चारच बॅगा युरिया द्यावा अशा सूचना विक्रेत्यांना कृषी विभागाने केल्या आहेत़

दरम्यान २९ हजार टन युरियाच्या या आवकनंतर गुजरात राज्यातील पाच युरिया उत्पादक कंपन्यांचे सात रॅक पुढील आठवड्यात येणार आहेत़ यातून किमान ५० हजार टनच्या पुढे युरिया आणि मिश्र खते शेतकºयांना मिळणार आहेत़ यामुळे जिल्ह्यात खत टंचाई होणार नाही असे कृषी विभागाचे म्हणणे आहे़ सद्यस्थितीत सोमवारपासून होणाºया युरिया वितरणाची माहिती कृषी विभागाकडून घेतली जाईल़

कृषी विभागाने युरियाची मागणी लक्षात घेता पाठपुरावा केला होता़ दोन रॅक आले आहेत़ सोमवारपासून युरिया वितरण सुरू होईल़ शेतकºयांनी आता जेवढी गरज आहे, तेवढाच युरिया घ्यावा़ पुढच्या आठवड्यात आणखी रॅक येणार असल्याने खतांची कोणतीही टंचाई जाणवणार नाही़
-प्रदीप लाटे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद़ नंदुरबाऱ

Web Title: The district received 29,000 tons of fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.