शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला मिळाले लसीचे २५ हजार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST

नंदुरबार : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात आला असून एक लाख डोस आतापर्यंत दिले ...

नंदुरबार : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात आला असून एक लाख डोस आतापर्यंत दिले गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात लसीअभावी काही केंद्रे बंद झाल्याची माहिती होती. दरम्यान यावर कार्यवाही करत आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्या आदेशाने २५ हजार कोविशिल्ड तर ५४० कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत.

आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यांनी सोमवारी जिल्ह्यात भेट दिली. यावेळी त्यांनी नंदुरबार, धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यातील लसीकरणाचा आढावा घेतला. याचदरम्यान जिल्ह्यातील काही भागात लसींचा साठा संपून केंद्र बंद पडल्याची माहिती समोर येत होती. यावर मार्ग काढत त्यांनी आरोग्य यंत्रणेसोबत संपर्क केला होता. यातून मंगळवारी जिल्ह्याला २५ हजार डोसचा साठा पुन्हा प्राप्त झाला आहे. यामुळे येत्या काळातील ४५ ते ६०, फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या दुसऱ्या लसीचा डोस पूर्णपणे मिळणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाने जिल्ह्यात सध्या ५५ ठिकाणी लसीकरण करण्यासाठी केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्रांवर दरदिवशी लसींचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान मंगळवारी लसींचा साठा प्राप्त झाल्यानंतर ३ हजार ६१७ जणांना लस देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ३५ हजार ९६६ डोस देण्यात आले आहेत. यात प्रथम आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे.

दुर्गम भागासाठी विशेष व्यवस्था

सोमवारी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात भेट देणाऱ्या डाॅ. अर्चना पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एन.डी. बोडके यांच्याकडून लसीकरणाचा आढावा घेत समाधान व्यक्त केले.

दरम्यान डाॅ. पाटील यांनी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात लसींचा तुटवडा भासू नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून आरोग्य यंत्रणेला कळवण्यात आल्यानंतर काही तासात येथे लसींचा साठा पाेहोचता केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे दुर्गम भागातील लसीकरण अविरत सुरु राहील असे त्यांनी म्हटले आहे.