घरकुल उद्दिष्टपूर्तीत जिल्हा आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:30 AM2019-11-20T11:30:03+5:302019-11-20T11:30:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत नंदुरबार जिल्ह्यातील तीन पंचायत समित्या राज्यातील अन्य पंचायतींच्या तुलनेत आघाडीवर ...

District leads in the goal of households | घरकुल उद्दिष्टपूर्तीत जिल्हा आघाडीवर

घरकुल उद्दिष्टपूर्तीत जिल्हा आघाडीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीत नंदुरबार जिल्ह्यातील तीन पंचायत समित्या राज्यातील अन्य पंचायतींच्या तुलनेत आघाडीवर राहिल्या आहे. त्यात अक्कलकुवा पहिल्या स्थानावर तर शहादा तालुकापाचव्या स्थानावर आहे. याबद्दल तिन्ही गटविकास अधिका:यांना 20 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात येणार           आहे.
शासनामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणा:या प्रधानमंत्री आवास योजनेत नंदुरबार जिल्ह्याने मोठी कामगिरी केली आहे. त्यात धडगाव, तळोदा व नंदुरबार पंचायत समित्या वगळता उर्वरित तिन्हीसमित्यांचे काम जोरात राहिले आहे. पंचायत समिती शहादा तालुक्यात 2016 -17 व 2018 - 19 या वर्षात जिल्हानिहाय घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. राज्यात अक्कलकुवा तालुका पहिल्या स्थानावर राहिला आहे. त्यानुसार शहादा पंचायत समितीला पंधरा हजार 459 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी पाच हजार 198 घरकुले पूर्ण केली आहे. त्यामुळे घरकुलाच्या उद्दिष्टपूर्तीत शहादा पंचायत समिती राज्यात पाचव्या स्थानावर राहिली आहे. दुस:या स्थानी शहापूर, तिस:या स्थानी  नवापूर, चौथा साक्री, पाचव्या    स्थानी शहादा तर सहाव्या  क्रमांकावर गोंदिया असे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उद्दिष्टपूर्तीत उल्लेखनीय कामगिरी करणा:या पंचायत समित्यांच्या गटविकास अधिका:यांना मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्यात शहादा पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी गोस्वामी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ग्रामविकास विभागाचे प्रधान  सचिव असीम कुमार गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
शहादा तालुका घरकुल लाभाथ्र्यांचे आधार फीडिंग कामासह अकाउंट व्हेरिफिकेशनमध्येही आघाडीवर राहिला.
चालू वर्षातील 2019 - 20 घरकुलांचे उद्दिष्ट आठ हजार 92 असून त्याचीही शंभर टक्के मंजुरी झाली.
 

Web Title: District leads in the goal of households

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.