प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्रा.आत्माराम महाजन, जिल्हा सचिव श्रीकांत पाठक, पालिका सभापती बबिता वसावे, प्रा.मुरलीधर उदावंत, जिल्हा उपाध्यक्ष कीर्तीकुमार शहा, प्रा.डाॅ.संजयकुमार शर्मा, जिल्हा संघटक प्रा.आर.ओ.मगरे, जितेंद्रसिंग राजपूत, रमेशकुमार भाट, वासुदेव माळी, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांचा शेतमाल जादा भावाचे आमिष दाखवून काही परप्रांतीय व्यापारी खरेदी करतात. मात्र, अनेकदा हे व्यापारी शेतकऱ्यांना पैसे न देता, त्यांची फसवणूक करतात. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो आहे. शेतकऱ्यांची ही फसवणूक टाळण्यासाठी बाजार समिती व शासनदरबारी व्यापाऱ्यांची नोंदणी करण्यात यावी. तळोदा, नवापूर या ठिकाणी वीज वितरण कंपनी कार्यालयाकडून वीज बिल देण्यात येत असून, सक्तीची वसुली सुरू आहे. वीज बिलाचा भरणा न करणाऱ्यांचा वीजप्रवाह खंडित करण्यात येत आहे. ही मोहीम थांबविण्यात यावी. लक्झरी बसमधून क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करण्यात येत आहे. ही वाहतूक थांबविण्यात यावी, वाळूचे डम्पर क्षमतेपेक्षा जादा वाळू भरून भरधाव वेगात धावत असल्याने अपघात होत आहेत. त्यावर आळा बसविण्यात यावा. नवापूर शहरातून एकेरी वाहतूक करण्यात यावी, यामुळे वाहतुकीची कोंडी टळेल, यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणारे सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी केले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST