अंगणवाड्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:30 PM2020-02-23T12:30:59+5:302020-02-23T12:31:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी गरोदर, स्तनदा माता व बालकांसाठी जिल्ह्यात एपीजे अब्दुल कलाम अमृत ...

District Collector angry over Anganwadis | अंगणवाड्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

अंगणवाड्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी गरोदर, स्तनदा माता व बालकांसाठी जिल्ह्यात एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरु करण्यात आली आहे. परंतु ही योजना राबविणाºया घटकांबाबत तक्रारी वाढल्या यासह अन्य प्रकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सर्व प्रकल्प अधिकाºयांना पत्रही देण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागांतर्गत १२ प्रकल्पांमध्ये राबवल्या जाणाºया या योजनेत कार्यरत अंगणसेविकांकडून पर्यवेक्षिका अधिकाºयांच्या नावाने कमीशन मागत असल्याच्या तक्रारी वाढल्या. ही बाब लोकमतने वृत्त पसिद्ध करीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी बैठक घेत कामकाज व कमिशनच्या तक्रारींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
अंगणवाडी स्तरावर आहार खरेदीसाठी समिती नियुक्त करीत माता बालकांचे पोषण करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतरही पर्यवेक्षिका समितीने खरेदी केलेल्या साहित्यावर बोट ठेवून बिले देत नसल्याचे काही ठिकाणी आढळून आले. हा वाद विकोपाला गेल्यामुळे त्याला वाचा फोडण्यासाठी वृत्त पसिद्ध केले. त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या नाराजीनुसार महिला बाल विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी.भवाने यांनी सर्व बाल विकास प्रकल्प अधिकाºयांना पत्र पाठवत या योजनेच्या संपूर्ण नोंदी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्र देण्यात आल्यामुळे अंगणवाडी व प्रकल्पस्तरावर खळबळ उडाली आहे. तर सद्यस्थितीत लाभ घेणाºया १२ ही बाल विकास प्रकल्पांमधील २२ हजर १५६ मातांना योजनेचा पारदर्शक लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तर दुर्गम भागातील भरोदर व स्थनदा माता यांनाही योजनेचा वेळेवर व अपेक्षित लाभ मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. परंतु प्रशासन स्तरावरही पारदर्शक कामकाज व्हावे, अशीही अपेक्षा जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमधील प्रामुखक्याने शहादा धडगाव तालुक्यातून व्यक्त होत आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी आठवड्यातून किमान १० अंगणवाड्यांना भेटी देत आहाराची तपासणी करावी, तसा अहवाल मुख्यालयास सादर करावा.
लाभार्थी उपस्थितीची स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा घेत नोंदी ठेवाव्या, त्याचा अहवाल मासिक खर्चासोबत बाल विकास अधिकाºयांच्या स्वाक्षरीने जोडावा.
लाभार्थी उपस्थितीपत्रक सादर केल्याशिवाय मासिक खर्च अहवाल स्वीकारला जाणार नाही.
आहार योजनेचे अनुदान अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर वितरित होत असून त्याचे बाल विकास अधिकाºयांनी लेखे यांच्या नोंदी ठेवत त्यावर नियंत्रण ठेवावे.
अमृत आहार योजनेंतर्गत खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी ठेवण्याचे आवाहन.
प्रत्येक लाभार्थ्यांच्या उपस्थितीच्या नोंदी अंगणवाडीसह पर्यवेक्षिकांकडे ठेवणे.
साप्ताहिक नियोजन करीत लाभार्थ्यांना देण्यात येणारी अंडी व केळीची नोंद करणे.

Web Title: District Collector angry over Anganwadis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.