जिल्हा प्रशासनाची खाजगी डॉक्टरांसोबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:20 PM2020-05-27T12:20:31+5:302020-05-27T12:20:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि आयएमएच्या प्रतिनिधी खाजगी डॉक्टर यांच्यात बैठक ...

District administration meeting with private doctors | जिल्हा प्रशासनाची खाजगी डॉक्टरांसोबत बैठक

जिल्हा प्रशासनाची खाजगी डॉक्टरांसोबत बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि आयएमएच्या प्रतिनिधी खाजगी डॉक्टर यांच्यात बैठक घेण्यात आली़ यावेळी तापाचे रुग्ण आढळल्यास खाजगी डॉक्टरांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिल्या़ आयएमनेही बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्दे मांडून कारवाई करण्याची मागणी केली़
बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एऩडी़ बोडके, डॉ.राजेश वसावे,आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश वळवी, डॉ.राजकुमार पाटील, डॉ.राजेश कोळी, डॉ.अनिकेत नागोटे, डॉ.गिरीष तांबोळी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी सांगितले की, पावसाळ्यात तापाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या तापाच्या रुग्णांची माहिती तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे द्यावी़ तापाच्या रुग्णात कोरोनाची लक्षणे असण्याची शक्यता लक्षात घेता दक्षता घेणे आवश्यक आहे.
विशेषत: तापाचे रुग्ण रेडझोनमधील जिल्ह्यात प्रवास करून आलेले असल्यास अशा प्रत्येक रुग्णाचे स्वॅब घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांची माहिती शासकीय यंत्रणेला देण्यात यावी. दोन ते तीन दिवसात लक्षणे कायम असल्यास अशा रुग्णांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येईल.
आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ़ राजेश वळवी यांनी शहरातील खाजगी डॉक्टरांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकून कोरोनाविरोधाच्या युद्धात खाजगी डॉॅक्टर प्रशासनाच्या सोबत असल्याचे यावेळी सांगितले़ बैठकीला सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्ह्यातील आयएमएचे सदस्य डॉक्टर उपस्थित होते.

आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ़ राजेश वळवी यांच्यासह प्रतिनिधींनी बैठकीत विविध आठ मुद्दे मांडून लक्ष वेधून घेतले़
जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने/रुग्णालये नियमित सुरु आहेत़
बºयाच हॉस्पिटल्समध्ये स्टाफची कमरता असतानाही कामकाज सुरळीत सुरु आहे़
हॉटस्पॉटमधून आलेल्या नागरिकांचे होम क्वारंटाईन कडक पद्धतीने प्रशासनाने करावे, ज्यांना कोविडची लक्षणे आहेत त्यांनी सरळ जिल्हा रुग्णालयात जावे, जेणेकरुन खाजगी रुग्णालयांवर ताण पडणार नाहीत किंवा ते बंद पडणार नाहीत़
खाजगी डॉक्टरांना मेडिकल इन्शुरन्स स्कीममधून शासनाने ५० लाख रुपयांचा विमा देण्याची तरतूद करावी़
रेड झोनमधून आलेल्या सर्व नागरिकांना होम क्वारंटाईनचा शिक्का सक्तीने मारण्यात यावा़
खाजगी दवाखान्यातून पाठवलेल्या गर्भवती मातांची कोविड तपासणी करण्यात यावी़
कोरोनाची लक्षणे असलेल्यांच्या स्वॅबचा अहवाल लवकर मिळावा़ शक्य असल्यास खाजगी प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाने मदत करावी़
शहरी भागांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कचरा संकलित करणाºया घंटागाड्यांच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती व उपाययोजना करणाºया आॅडिओ क्लिप्स प्रसारित करण्यास प्राधान्य देण्यात यावे़

बैठकीत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी रक्तदान शिबिर घ्यावे, दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहतील आणि आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा राहील याची दक्षता घ्यावी. मुख्यालयी न राहणाºयांविरोधात कारवाई करावी, प्रत्येक शासकीय रुग्णालयात आॅक्सीमीटर ठेवण्यात यावे, तालुका स्तरावर क्वारंटाईन केंद्राची क्षमता दुप्पट करण्यासाठी आवश्यक जागेची पाहणी करावी, क्वारंटांईन केंद्रातील व्यक्ती घरी परतल्यानंतर सॅनेटायझेशन आणि घराच्या स्वच्छतेवर भर द्यावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी बैठकीत दिले़

Web Title: District administration meeting with private doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.