लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तोरणमाळ येथे हरियाली संस्थेमार्फत दुर्गम भागातील नागरिकांना बँकेट व संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. या संस्थेमार्फत गेल्या 18 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष हैदरअली नुरानी, जि.प. सदस्य अभिजित पाटील, नगरसेवक मकरंद पाटील, सरकारी वकील सुशील पंडित, मौलाना शेख, नोमान अली बिलासपुरवाले, शहादा बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, डॉ.शशांक कुलकर्णी, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, तोरणमाळचे सरपंच मधुकर चौधरी, माजी सरपंच सीताराम पावरा, अनिल भामरे आदी उपस्थित होते. या वेळी 500 गरजूंना ब्लँकेट तर 300 कुटुंबांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.दीपक पाटील म्हणाले की, सामाजिक बांधीलकी ठेवत हरियाली संस्थेने गेल्या 18 वर्षापासून या परिसरातील आदिवासी कुटुंबातील लोकांना संसारोपयोगी साहित्य वाटपाचा उपक्रम स्तुत्य आहे. अभिजित पाटील यांनी दुर्गम भागात आजही प्राथमिक सुविधा नसल्याची खंत व्यक्त केली. अॅड.सुशील पंडित, संगीता पाटील, अरुण, चौधरी प्राचार्य मकरंद पाटील, सरपंच मधुकर चव्हाण, सीताराम पावरा यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शहादा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, शहाद्याचे नगरसेवक संदीप पाटील, के.डी. पाटील, विनोद चौधरी, दाऊदी बोहरी समाजाचे जोएब कादियानी, जाहीद कादियानी, हुसैन कादियानी, अंधश्रद्धा निमरूलन समितीचे विनायक सावळे, जायण्टस् ग्रुप सहलीच्या संगीता पाटील, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता कादरी, शेगाव अग्रसेन पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील पाटील, हरियाली को-ऑपरेटिव्ह संस्थेचे व्यवस्थापक विजय पाटील, माआद र्मचट, मुश्ताक अली आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नुह नुरानी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.आर.टी. पाटील यांनी केले.
तोरणमाळ येथे संसारोपयोगी साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 20:44 IST