अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ७० टक्के मदतीचे वाटप पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 12:20 PM2020-10-26T12:20:22+5:302020-10-26T12:20:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये अतीवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या २० हजार शेतकर्यांना शासनाने ...

Distribution of 70% assistance to farmers affected by heavy rains completed | अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ७० टक्के मदतीचे वाटप पूर्ण

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ७० टक्के मदतीचे वाटप पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये अतीवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या २० हजार शेतकर्यांना शासनाने जाहिर केलेली मदत वाटप करण्यात नंदुरबार जिल्हा प्रशासन नाशिक विभागात पुढे आहे. आतापर्यंत तब्बल ६९ टक्के मदतीचे वाटप पूर्ण करण्यात आली आहे.     
 गेल्या वर्षी अतीवृष्टीमुळे कोरड व बागायत क्षेत्रातील १० हजार शेतकर्यांच्या शेती उत्पादनांचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंचनामे करुन ३३ कोटी १३ लाख २३ हजार रूपयांच्या रकमेची मागणी केली होती. या मागणीनुसार शासनाने गेल्या महिन्यात जिल्ह्यासाठी १६ कोटी ५६ लाख ६१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर करुन वितरण केले होते. या मदतीचे वितरण सध्या तालुकास्तरावर सुरू आहे. यांतर्गत आतापर्यंत ८ हजार शेतकर्यांना ११ कोटी रूपयांची मदत देण्यात आली असून उर्वरित शेतकर्यांना येत्या आठ दिवसात पैसे देण्यात येणार आहे. दरम्यान येत्या २९  सप्टेंबरपूर्वी जिल्ह्याला मंजूर असलेला दुसर्या टप्प्यातील निधी देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रक्कम वितरणात नंदुरबार जिल्हा नाशिक विभागात पुढे असताना धडगाव आणि तळोदा तालुका प्रशासनाने प्रथम क्रमांक पटकावला  आहे. धडगाव तालुक्यातील १ हजार १०१ शेतकऱ्यांना २० दिवसात ५४ लाख २८ हजार रूपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले. तर तळोदा तालुक्यातील दोन हजार ६६१ शेतकर्यांना दोन कोटी ७६ लाख ११ हजार ९२५ रुपयांच्या मदतनिधीचे वितरण केले आहे. दोन्ही तालुके नेट कनेक्टीव्हीटी व बँकामधील समस्यांसाठी ओळखली जाते. असे असतानाही दोन्ही तालुक्यांनी १०० टक्के मदत वाटप करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच नंदुरबार तालुक्यात २ हजार ४१५ शेतकरी, शहादा १ हजार २७५ तर अक्कलकुवा तालुक्यात १ हजार १०१ शेतकऱ्यांना मदत मिळाली असल्याची माहिती आहे. 
 

प्रशासनाने नंदुरबार तालुक्यासाठी ४ कोटी ६९ लाख ३३ हजार ५००, नवापूर ५३ लाख ७१ हजार ५००, शहादा ६ कोटी ९९ लाख ५२ हजार ५००, तळोदा २ कोटी ७६ लाख १२ हजार, अक्कलकुवा १ कोटी ३६ लाख ६४ हजार तर धडगाव तालुक्यासाठील ५४ लाख २८ हजार रूपयांच्या निधीचे वितरण केले होते. तहसील कार्यालयांकडे वर्ग करण्यात आलेली ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यांवर वितरीत करण्याचे काम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले होते. यांतर्गत आजअखेरीस ८ हजार १९९ शेतकर्यांना ११ कोटी ४७ लाख ९९ हजार ८७७ रूपयांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहेत. यात नंदुरबार ३ कोटी १५ लाख ६१ हजार २०४, नवापूर ३ लाख ३५ हजार ५८०, शहादा ४ कोटी २९ लाख २७ हजार ५७६ तर अक्कलकुवा तालुक्यात ६९ लाख ३५ हजार ५९२ रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. 

बँकांमध्ये होवू लागली गर्दी
जिल्हा प्रशासनाने बागायत आणि कोरड अशी वर्गवारी करत निधीचे वितरण केले आहे. परंतु यात नवापूर तालुक्याची पिछेहाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील २८७ कोरडवाहू नुकसान झालेल्या शेतकर्यांना ३ लाख ३५ हजार ५८० रूपयांची मदत दिली गेली आहे. तर एकाही बागायतदार शेतकर्याला मदत मिळालेली नसल्याची माहिती आहे. आतापर्यंत एकूण ३ हजार ३९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेल्या कोरड व २ हजार २८० हेक्टर क्षेत्रातील बागायतदार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यांवर टाकण्यात आलेली ही रक्कम त्यांना प्राप्त झाल्यानंतर काढण्यासाठी गर्दी होत आहे. 

Web Title: Distribution of 70% assistance to farmers affected by heavy rains completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.