लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अंगणात कचरा टाकल्याच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबारातील शाळा क्रमांक एक समोरील कॉम्पलेक्सच्या मागील बाजूच्या वसाहतीत ही घटना घडली. महिलेने घर व दुकानासमोर कचरा टाकल्यामुळे बाबू लोहार, माजीद अब्दुल पिंजारी, इरफान शहा, इरफान हारून खाटीक सर्व रा.नंदुरबार यांनी महिलेशी वाद घातला. तिला धक्काबुकी करीत विनयभंग केला तसेच मारण्याची धमकी देत शिविगाळ केली.याबाबत महिलेने फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार तातू निकुंभ करीत आहे. संशयीतांना अद्याप ताब्यात घेण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:02 IST