किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:28 IST2019-12-31T12:28:14+5:302019-12-31T12:28:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा शहरात घराच्या भिंतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शनिवारी घडली होती़ याप्रकरणी ...

 Disobedience to a woman in the face of minor controversy | किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत महिलेचा विनयभंग

किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत महिलेचा विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा शहरात घराच्या भिंतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शनिवारी घडली होती़ याप्रकरणी पोलीसात परस्परविरोधी फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तळोदा शहरात मेनरोड भागातील महिलेने शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास महिलेने घराच्या सामाईक भिंतीवरील पत्रा काढला होता़ याच राग धरुन शेजारी राहणाऱ्या आकाश संतोष दिघवा, शुभम संतोष दिघवा, कृष्णदास राठोड, कमलबाई कृष्णदास राठोड या चौघांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली़ दरम्यान एकाने महिलेला गुप्ती दाखवून पोटात अमानुषपणे लाथा मारल्या़ यावेळी अंगावरील कपडे फाडून पिडितेचा विनयभंग केला़ दरम्यान तिच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान करत दमदाटी केली़ याबाबत पिडितेच्या फिर्यादीवरुन आकाश, शुभम, शोभना व कमलबाई राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे़ पोलीसांनी रविवारी रात्री उशिरा आकाश व शुभम यांना अटक केली़
दुसºया गटाकडून शोभनाबाई राठोड यांच्या फिर्यादीनुसार राजेंद्र मुरलीधर राठोड, देवेंद्र राजेंद्र राठोड, हर्षल राजेंद्र राठोड, भरत जयंतीलाल राठोड, शरद राठोड, लक्ष्मीबाई राठोड, अर्चना राठोड सर्व रा़ तळोेदा यांनी घरात माती पडली या कारणातून वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी हर्षल व भरत यांनी रॉडने मारहाण करुन शुभम यास जखमी केले़ विनयभंग करण्याची धमकी देऊन गळ्यातीलसोन्याची पोत तोडून नुकसान केले़ गुन्हा दाखल करण्यात येऊन भरत राठोड यास पोलीसांनी रविवारी रात्री अटक केली़

Web Title:  Disobedience to a woman in the face of minor controversy