शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

चर्चा बिबट्यांच्या बछड्यांची निघाले रानमांजराचे पिल्लू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार-उमर्दे रस्त्यावरील कापसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आल्याचे मोठ्या प्रमाणावर चर्चीले गेले. सोशल मिडियावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार-उमर्दे रस्त्यावरील कापसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आल्याचे मोठ्या प्रमाणावर चर्चीले गेले. सोशल मिडियावर त्याचे फोटो टाकून ते विविध गावाच्या शिवारात आढळल्याचे सांगितले गेले. परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उमर्दे रस्त्यावरील शेतात भेट दिली असता बछडे नव्हे तर ते रान मांजराचे पिलू असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण काहीसे निवळले.उमर्दे रस्त्यावरील शेखर मराठे यांच्या शेतात रविवारी बिबट्याचे दोन बछडे आढळल्याचे बोलले जात होते. काहींनी तेथील शेतमजुराच्या हातात असलेल्या बछड्यांचे छायाचित्र घेऊन ते सोशल मिडियावर व्हायरल केले. त्याला विविध गावांची जोड देण्यात आली. जसे पुढे फॉरवर्ड होत गेले तसे गावांची नावेही बदलत गेली. आष्टे, नांदर्खे, रनाळा, खोक्राळे आदी गाव शिवार त्याला जोडण्यात आले. यामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावण निर्माण झाले. सद्या शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी, शेतमजूर शेतांमध्ये दिवसभर राबत आहेत. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी देखील शेतकºयांना जावे लागत आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली.ते तर रानमांजरचे पिल्लूवन विभागाने उमर्दे शिवारातील मराठे यांच्या शेतात जाऊन पहाणी केली. तेथील शेतमजुराने पकडलेल्या पिल्लूंची पहाणी केली असता ते रानमांजराची पिल्ले असल्याचे वन विभागाचे अधिकारी मनोज रघुवंशी यांनी सांगितले.पिल्लू लहान असतांना ते बिबट्याच्या बछड्यांसारखेच दिसते. पहातांना अनेकांची गफलत होऊ शकते. त्यामुळे जाणकार आणि वन विभागाला कळवून माहिती जाणून घेतल्यास अफवा पसरणार नाहीत असेही वन विभागाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, गेल्या वर्षभरात वावद, रनाळा, वटबारे, ठाणेपाडा जंगलात वाघसदृष्य प्राणी पाहिल्याचा दावा अनेकांनी केला आहे. परंतु वन विभागाने कधीही त्याला पुष्टी दिली नाही. बिबट्याचा संचार या भागात आहे. नर व मादी दोन्ही या भागात काही वेळा आढळून आलेली आहेत. परंतु वाघ असल्याबाबतच्या कुठलीही पदचिन्हे किंवा इतर माहिती उपलब्ध नसल्याचे यापूर्वीच वन विभागानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

४रानमांजर हे सहज ओळखता येते. मुखाचा भाग पाहिल्यास प्रथम ते बिबट्याच दिसते. परंतु पाय लांब, शेपूट आखूड, डोळे फिकट हिरवे, कान तांबूस, रंग भुरकट व राखाडी, शेपटीचे टोक काळे तर पंजे फिक्कट पिवळसर असतात. हा प्राणी भित्रा आहे. परंतु चेहऱ्यावरील कौर्यमुळे भिती निर्माण होते. गवताळ, झुडपे व दलदलीच्या भागात रानमांजर मोठ्या प्रमाणावर आढळून येते.