शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

तोरखेड्यातील महिला रुग्णावर धुळ्यात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा गावातील ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने गावात उपाययोजना करण्यात आल्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा गावातील ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने गावात उपाययोजना करण्यात आल्या. या रुग्णाच्या अतिसंपर्कातील आठ जणांना शहादा येथील विलगीकरण कक्षात तर २३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या महिलेवर धुळे येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तोरखेडा गावातील एका रुग्णाला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री उशिरा या रुग्णाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने गावात खळबळ उडाली. या रुग्णाच्या रहिवास परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली असून संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन क्षेत्र घोषित करून गावात कडक लॉकडाऊन जारी केला आहे. संपूर्ण गावातील गल्ल्या, मुख्य सीमा बॅेरिकटे लावून बंद करण्यात आल्या आहेत. संपूर्ण गाव कडकडीत बंद असून व्यावसायिकांनीही त्याला प्रतिसाद दिला आहे. जवळील हिंगणी हे गाव बफर झोनमध्ये करण्यात आले आहेत. तोरखेडा गाव हे बाजारपेठेचे गाव असून आजूबाजूच्या पाच ते सहा गावातील नागरिक येथे दैनंदिन कामासाठी दररोज येतात. तसेच संबंधित रुग्ण व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आली असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.तोरखेडा येथील रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी, कोवीड कक्ष अधिकारी किशोर खैरनार, वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहने, मंडळ अधिकारी विजय साळवे, तलाठी शशिकांत सावळे, ग्रामविकास अधिकारी चेतन पाटील, पं.स.चे माजी सदस्य प्रियदर्शन कदमंबाडे, पोलीस पाटील दयाराम चौधरी, सारंगखेड्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, ग्रा.पं. सदस्य कैलास सोनवणे, दीपक चौधरी, आशा कार्यकर्ती व आरोग्य पथकाने गावात भेट दिली व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत असून त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता तोंडाला मास्क लावावा, कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, हाताला सॅनिटायझर लावावे, हात स्वच्छ धुवावे, स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, अशा सूचना सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, पोलिस पाटील, आरोग्य अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्या आहेत.शहादा : तालुक्यातील तोरखेडा येथील ६५ वर्षीय महिला धुळे येथे कोरोना विषाणू बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनातर्फे या महिलेच्या अतिसंपर्कातील आठ जणांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली. ही महिला उपचारासाठी शिरपूर गेली होती. तेथे बाधीत रूग्णाच्या संपर्कात आल्यामुळे महिला बाधीत झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. प्रशासनातर्फे संबंधित महिलेची व कुटुंबातील सदस्यांची प्रवास व इतर हिस्ट्री जाणून घेतली जात आहे.गेल्या सात दिवसात शहादा शहरातील तीन व तोरखेडा येथे एक असे एकूण चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले असून या चौघांच्या अतिसंपर्कातील २७ व्यक्तींच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.