तोरखेड्यातील महिला रुग्णावर धुळ्यात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:52 PM2020-06-29T12:52:38+5:302020-06-29T12:52:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा गावातील ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने गावात उपाययोजना करण्यात आल्या. ...

Dhule treatment on a female patient in Torkheda | तोरखेड्यातील महिला रुग्णावर धुळ्यात उपचार

तोरखेड्यातील महिला रुग्णावर धुळ्यात उपचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा गावातील ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने गावात उपाययोजना करण्यात आल्या. या रुग्णाच्या अतिसंपर्कातील आठ जणांना शहादा येथील विलगीकरण कक्षात तर २३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या महिलेवर धुळे येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तोरखेडा गावातील एका रुग्णाला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री उशिरा या रुग्णाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने गावात खळबळ उडाली. या रुग्णाच्या रहिवास परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली असून संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन क्षेत्र घोषित करून गावात कडक लॉकडाऊन जारी केला आहे. संपूर्ण गावातील गल्ल्या, मुख्य सीमा बॅेरिकटे लावून बंद करण्यात आल्या आहेत. संपूर्ण गाव कडकडीत बंद असून व्यावसायिकांनीही त्याला प्रतिसाद दिला आहे. जवळील हिंगणी हे गाव बफर झोनमध्ये करण्यात आले आहेत. तोरखेडा गाव हे बाजारपेठेचे गाव असून आजूबाजूच्या पाच ते सहा गावातील नागरिक येथे दैनंदिन कामासाठी दररोज येतात. तसेच संबंधित रुग्ण व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आली असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
तोरखेडा येथील रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी, कोवीड कक्ष अधिकारी किशोर खैरनार, वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहने, मंडळ अधिकारी विजय साळवे, तलाठी शशिकांत सावळे, ग्रामविकास अधिकारी चेतन पाटील, पं.स.चे माजी सदस्य प्रियदर्शन कदमंबाडे, पोलीस पाटील दयाराम चौधरी, सारंगखेड्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, ग्रा.पं. सदस्य कैलास सोनवणे, दीपक चौधरी, आशा कार्यकर्ती व आरोग्य पथकाने गावात भेट दिली व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत असून त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता तोंडाला मास्क लावावा, कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, हाताला सॅनिटायझर लावावे, हात स्वच्छ धुवावे, स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, अशा सूचना सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, पोलिस पाटील, आरोग्य अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्या आहेत.

शहादा : तालुक्यातील तोरखेडा येथील ६५ वर्षीय महिला धुळे येथे कोरोना विषाणू बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनातर्फे या महिलेच्या अतिसंपर्कातील आठ जणांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली. ही महिला उपचारासाठी शिरपूर गेली होती. तेथे बाधीत रूग्णाच्या संपर्कात आल्यामुळे महिला बाधीत झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. प्रशासनातर्फे संबंधित महिलेची व कुटुंबातील सदस्यांची प्रवास व इतर हिस्ट्री जाणून घेतली जात आहे.
गेल्या सात दिवसात शहादा शहरातील तीन व तोरखेडा येथे एक असे एकूण चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले असून या चौघांच्या अतिसंपर्कातील २७ व्यक्तींच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Dhule treatment on a female patient in Torkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.