धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात निवडणूकीच्या वादातून दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:52 AM2020-01-13T11:52:23+5:302020-01-13T11:52:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांनंतर आता वादांना तोंड फुटत असून ...

Dhadgaon and Akkalkuwa taluka beat both by election dispute | धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात निवडणूकीच्या वादातून दोघांना मारहाण

धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात निवडणूकीच्या वादातून दोघांना मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांनंतर आता वादांना तोंड फुटत असून अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांना मारहाण करण्यात आली़ धडगाव तालुक्यात शनिवारी तर अक्कलकुवा तालुक्यात ८ रोजी मारहाणीचा प्रकार घडला होता़
धडगाव
गौऱ्याचा पाटीलपाडा ता़धडगाव येथील कुवरसिंग मारग्या पराडके या युवकाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत मदत केली नाही, यावरुन शिवाजी होमा पराडके याच्यासोबत वाद झाला होता़ शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कुवरसिंग हा घराकडे जात असताना तळोदा-धडगाव रस्त्यावर पालखा गावाजवळील पुलावर शिवाजी पराडके याने थांबवून पुन्हा वाद घातला होता़ यातून शिवाजी पराडके याच्यासह काकड्या वेस्ता पराडके, दिलीप काकड्या पराडके, मोहन ऊर्फ मोवाशा पराडके, दिगंबर ऊर्फ सुंड्या पराडके सर्व रा़ गौºयाचा कारभारीपाडा यांनी कुवरसिंग पराडके यांना डेंगाºयाने मारहाण करत शिवीगाळ केली़ दरम्यान कुवरसिंग हा गौºयाचा पाटीलपाडा येथील घरी गेल्यानंतरही सर्व पाच संशयितांनी पुन्हा वाद घातला होता़ यावेळी त्याची आई व चुलत भाऊ हे भांडण सोडवण्यासाठी आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली़
याप्रकरणी कुवरसिंग याने दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व पाच संशयितांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली़ त्यांच्यावर रविवारी न्यायालयीन कारवाई झाल्याची माहिती आहे़ यातील संशयित शिवाजी पराडके राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी आहे़
अक्कलकुवा
तालुक्यातील ओघाणीचा चापडीपाडा येथील मगन मुवाश्या वसावे याची पत्नी निवडणूकीत उमेदवारी करत होती़ तिला मतदान केले नाही यावरुन मगन वसावे याने मोग्या दमण्या वसावे रा़ ओघाणीचा ्नचापडीपाडा याला आठ जानेवारी रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर घरात घुसून मारहाण केली होती़ डेंगाºयाने मारहाणीत मोग्या वसावे हा जखमी झाला होता़
उपचार पूर्ण झाल्यानंतर शनिवारी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मगन वसावे व प्रताप वसावे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवदास पाडवी करत आहेत़

Web Title: Dhadgaon and Akkalkuwa taluka beat both by election dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.