शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

कापूस खरेदीवर ओपन मार्केटचा वार तरीही सीसीआय दोन लाखांच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या शहादा आणि नंदुरबार येथे सीसीआय अर्थात काॅटन कार्पोरेशन ऑफ इंडियाने सुरु केलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीच्या शहादा आणि नंदुरबार येथे सीसीआय अर्थात काॅटन कार्पोरेशन ऑफ इंडियाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रांवर यंदा दोन अडीच लाख क्विंटल कापूस खरेदी पूर्ण झाली आहे. गावखेड्यावर खाजगी व्यापारी सीसीआयच्या दरांच्या बरोबरीने दर देत असतानाही दोन्ही केंद्रात मोठी आवक झाली आहे. २०१९ च्या खरीप हंगामातील कापूस खरेदी जून २०२० पर्यंत सुरु होती. यातून शेतक-यांनी गेल्या खरीप हंगामातही पुन्हा कापसावर भिस्त ठेवत १ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड केली होती. यातून मोठ्याप्रमाणावर उत्पादन येणार अशी शक्यता असताना कापसावर लाल्याचे आक्रमण झाले होते. यातून सावरत शेतक-यांनी हाती असलेला कापूस वेचणी करत सीसीआयकडे नोंदणी केली होती. नंदुरबार तालुक्यात साधारण साडेसात हजार तर शहादा तालुक्यात साडेआठ हजार शेतक-यांनी नोंदणी करुन कापूस विक्री केली होती. नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेल्या या खरेदीला वेळोवेळी ब्रेक लागूनही जानेवारीच्या मध्यातच शहादा आणि नंदुरबार केंद्राने अडीच लाख क्विंटल कापूस खरेदी पूर्ण केली आहे. दरम्यान खाजगी व्यापारी सीसीआय देत असलेल्या ५ हजार ७०० ते ५ हजार ८०० रूपयांपर्यंत दर देत असतानाही गेल्या काही वर्षात खेडा खरेदीत झालेल्या फसवणूकीमुळे शेतकरी सीसीआयकडेच कापूस देत आहेत. यातून केवळ अडीच महिन्याच्या काळात ही खरेदी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. नंदुरबार येथील केंद्रावर गेल्या दोन दिवसांपूर्वीच एक क्विंटल कापूस खरेदीचा टप्पा पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतक-यांचा कापूस विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने शेतकरी याठिकाणी धाव घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. शहादा तालुक्यात मात्र या उलट  स्थिती निर्माण झाली आहे. शेतक-यांना संपर्क करत खेडा खरेदी करणारे थेट घरापर्यंत जावून मालाची उचल करु लागल्याने शहादा तालुक्यातील कापूस खरेदीचा हंगाम आवरता झाल्याचे बोलले जात आहे. यातच खेतिया बाजारातही कापसाचे दर वाढले असल्याने शहादा तालुक्यातील शेतक-यांना तिकडची वाट धरली आहे. 

   नंदुरबार १ लाख पार  नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी येथील खरेदी केंद्रात एक लाख २०० क्विंटल कापूस आवक आजअखेरीस झाली आहे.  या केंद्रात ५ हजार ८६० रूपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केला गेला.नंदुरबार सह धुळे जिल्ह्यातून येथे कापूस आवक झाली होती. 

   शहाद्यात आवक थंड  शहादा बाजार समिती सीसीआयचे केंद्र चालवते. याठिकाणी आतापर्यंत १ लाख ५८ हजार क्विंटल कापूस आवक झाली आहे.  परंतू तूर्तास आवक थांबल्याची माहिती देण्यात आली आहे. तालुक्यात खाजगी व्यापारी ५ हजार ७०० रूपयांपर्यंत दर देत असल्याने ही स्थिती आहे. 

जिनिंग उद्योगाला मिळतोय बुस्टर   लाॅकडाऊनमुळे गेल्या हंगामात नुकसान सोसणा-या जिनिंग उद्योगाला यंदा कापूस खरेदीमुळे बुस्टर मिळाले आहे. नंदुरबार बाजार समितीकडून सीसीआयसोबतच तीन परवानाधारक व्यापा-यांना कापूस खरेदीस मुभा दिली गेली आहे. त्यांच्याकडेही कापूस येत असल्याने त्याचे जिनिंग होवू जिल्ह्यातून कापूस गाठींची निर्यात सुरु झाली आहे.