शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

हताश बाप अन् रस्त्याची धाप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 12:13 IST

किशोर मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्तेच नसल्याने तेथील लोकांना एखादा रुग्ण आजारी पडला ...

किशोर मराठे ।लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्तेच नसल्याने तेथील लोकांना एखादा रुग्ण आजारी पडला तर त्याच्या नातेवाईकांना बांबूची झोळी करून रुग्णालयापर्यंत न्यावे लागते ही नेहमीचीच उदाहरणे आहेत. पण आजारी रुग्णाला जेव्हा बांबूच्या झोळीत नेण्यासाठी चार लोकंच मिळत नाहीत तेंव्हा रुग्णाच्या एखाद्या नातेवाईकाला आपल्या खांद्यावर घेऊनच रुग्णालयाची वाट धरावी लागते, ही बाबही आता समोर आली आहे. अक्कलकुव तालुक्यातील चिखलीचा आसनबारीपाडा या गावापासून हमरस्त्यावर येण्यासाठी रस्ताच नाही. जो आहे तो गुडघ््या इतक्या चिखलाने भरला आहे. याच रस्त्यावरून गुरुवारी एका हताश बापाला आपल्या अपंग मुलाला रुग्णालयात आणण्यासाठी त्याच्या खांद्यावर मुलाचे ओझे घेऊन पायपीट करावी लागल्याची दुर्दैवी घटना घडली.ही घटना आहे अक्कलकुवा तालुक्यातील चिखलीचा आसनबारीपाडा येथील. रामजी रुमा वसावे यांचा १६ वर्षीय मुलाला अचानक एका पायाने अपंगत्व आले. त्याला उभे राहणेही जिकरीचे जाऊ लागले. वेदना अधीक असह्य झाल्याने आई-बापाच्या मनातील कालवाकालव वाढली. आताच दवाखान्यात न्यावे यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. गाव ते जवळच्या निंबीपाडापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. पायवाट पुर्ण चिखलाने आणि दगडगोट्यांनी भरलेली. करायचे काय? बांबूला झोळी बांधून न्यावी तर सोबत कुणीच नाही.आजूबाजूचे राहणारे सर्व शेतात कामासाठी गेलेले. ते येतील तोपर्यंत अंधार होईल. त्यामुळे मुलाच्या आईने तयारी दर्शविली. परंतु तिच्याकडून बांबूच्या झोळीचे वजन उचलले जात नव्हते. अशा वेळी पित्यानेच मुलाला वाचविण्यासाठी त्याला थेट खांद्यावर घेतले आणि एक किलोमिटरची चिखलाच ती देखील दऱ्याखोºयातील पायवाट तुडवली.एक किलोमिटर अंतरावरील पाटीलपाडापर्यंत नेल्यावर तेथे दुचाकीच सोय झाली. पाटीलपाडा ते निंबीपाडा हा पुन्हा एक किलोमिटरचा तसाच खाचखळगे आणि चिखलाचा. तो देखील दुचाकीवर पार करण्याचे दिव्य कसेबसे पार पडले. तेथून वाहनाद्वारे आपल्या पोटच्या गोळ्याला गुजरातमधील मालसमट येथील दवाखान्यात दाखल केले. ४सातपुड्यातील अनेक गाव व पाडे पावसाळ्यात मुख्य प्रवाहापासून तुटतात. दळणवळण यंत्रणा खंडित होते. कुणी आजारी पडले तर त्यांना बांबूच्या झोळीतून न्यावे लागते. त्यासाठी दºयाखोºयातील पायवाट तुडवावी लागते. दरवर्षाची ही स्थिती असते.४यामुळे अनेकांचा अर्ध्या वाटेवरच जीव जातो. अनेकांना कायमचे अपंगत्व भोगावे लागते. कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत कुणीही गांभिर्याने घेत नाही.४दरवर्षाची स्थिती असल्याने रोज मरे त्याला कोण रडे अशी स्थिती सातपुड्यातील दुर्गम भागातील आहे. ४पावसाची संततधार सुरू असल्याने मातीच्या रस्त्यावर पावसामुळे चिखल होवुन जातो. चिखलीच्या आसनबारीपाडा-पाटीलपाडा ते निंबीपाडा दोन किलोमीटर मातीच्या चिखलमय रस्ता आहे. त्यात एक किलोमीटर आसनबारीपाडा ते पाटीलपाडा खुपच चिखलमय असल्याने मोटरसायकल देखील निघु शकत नाही. त्यामुळे बांबूलेन्स शिवाय पर्याय नसतो.४यासाठी किमान चार जणांची आवश्यकता असते. परंतु तेवढेजण उपलब्ध झाले नाहीत तर अडचणींचा सामना करावा लागतो. लहान मुलं राहिले तर आई व वडिल त्याला खांद्यावर घेऊन जाऊ शकतात. मोठी माणसं राहिली तर मात्र मोठी समस्या निर्माण होते.