शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

लोकसंघर्ष मोर्चातर्फे तळोदा तहसील कार्यालयावर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:30 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  केंद्र शासनाच्या शेतकरी, कामगार विरोधी विधेयक तत्काळ मागे घ्यावे यासाठी येथील लोकसंघर्ष मोर्चाच्या ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  केंद्र शासनाच्या शेतकरी, कामगार विरोधी विधेयक तत्काळ मागे घ्यावे यासाठी येथील लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने गुरूवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले.केंद्रातील मोदी सरकारने संसदेत कुठलीही चर्चा होऊ न देता लोकशाही मूल्य पायदळी तुडवत नुकतेच दोन्ही सभागृहात शेतकरी व कामगारांच्या विरोधात अवाजवी मतदानाने विधयेके पारीत करून घेतलीत. यात कृषी उपज, वाणिज्य तथा व्यापार, मूल्य आश्वासन, आवश्यक वस्तू अधिनियम हे तीन कायदे मंजूर केले आहेत. मात्र हे कायदे ग्रामीण शेती व्यवस्थेचे कंबरडे मोडणारी आहेत. शिवाय शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे आहेत. कारण शेतकऱ्यांच्या मालाची खुल्या बाजारात खरेदी-विक्री करताना शासनाच्या देखरेखीची व योग्य हमीभावासह हस्तक्षेपाची गरज असताना त्याच्या बाजुने कायद्यात कुठलेही ठोस नियम अथवा व्यवस्था निर्माण करण्यात आलेले नाही. त्यामुळे सरळ बाजार समित्या बरखास्ती व व्यापारींना खुल्या लुटीची सूट देण्यात आली आहे. तसेच शेती मोठ्या उद्योगांना देण्याचे  षडयंत्र आहे. त्यामुळे हे विधेयक तत्काळ रद्द करावे, यासाठी येथील लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने गुरूवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी निर्देशने केली. या वेळी शासनाच्या विधेयकाविरोधात घोषणा देण्यात आल्या.दरम्यान, शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. अक्कलकुवा, तळोदा तालुक्यातील प्रलंबीत वैयक्तिक व सामूहिक वनदाव्यांची तत्काळ सुनावणी करून सर्व दावेदार आदिवासींना त्यांच्या हक्काची जमीन नावावर करून द्यावी. शिवाय पट्टेधारकांना पीक कर्ज उपलब्ध करून देऊन आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत विहीर, बोअरवेल, जमीन सपाटीकरण योजना घाव्यात. खावटी कर्ज बिना अट द्यावे, त्यांना किसान सन्मान योजनेत समाविष्ठ कराव, याशिवाय विविध कार्यकारी सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समितीत बिनशर्त सभासद करावे, केशरीकार्ड धारकांना प्राधान्य कुटुंबात घेऊन सर्वांना दोन रूपये दराने धान्य द्यावे, रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक गावात गाव शिवार फेरीचे आयोजन करून १०० दिवसाच्या रोजगाराचा आराखडा तयार करावा, अवकाळीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे, जी वनजमीन महसूल विभागाकडे वर्ग केली आहे. ती जमीन दावेदारांच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी केली आहे. या आंदोलनात निशांत मगरे, राजा वळवी, बुधा पाडवी, दिलवर वळवी, लालसिंग मोेरे, कृष्णा पावरा, ज्ञानेश्वर ठाकरे, विलास गावीत, दिलीप पाडवी, रमेश वसावे, बाबुसिंग नाईक आदी सहभागी झाले होते.