शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
3
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
4
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
5
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
6
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
7
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
8
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
9
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
10
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
11
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
12
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
13
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
14
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
15
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
17
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
18
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
19
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
20
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

चेतक फेस्टीवलच्या निधीला दानवेंचा आक्षेप का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:15 IST

- रमाकांत पाटील सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलला राज्य शासनाने गेल्या वर्षापासून दरवर्षी पाच कोटी रुपये देण्याचे जाहीर करून या ...

- रमाकांत पाटीलसारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलला राज्य शासनाने गेल्या वर्षापासून दरवर्षी पाच कोटी रुपये देण्याचे जाहीर करून या फेस्टीवलला ‘ग्लोबल’ स्वरुप देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्याच वर्षी मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या अश्व संग्रहालयाच्या कामाची बोंब असताना यंदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे निधी न देण्याची शिफारस शासनाला करणार असल्याचे सांगितले. मुळातच चेतक फेस्टीवल हा जिल्ह्यातील अंतर्गत वादातीत मुद्दा असला तरी या फेस्टीवलमुळे जिल्ह्याचे नाव राज्य आणि देश पातळीवर पोहोचत आहे. शिवाय हा फेस्टीवल झाल्यास यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत किमान महिनाभर अनेकांचा रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे निधी अडविण्याच्या भाषेबद्दल जिल्ह्यात नाराजीचा सूर आहे.नंदुरबार जिल्हा मुळातच राज्यात मागास जिल्ह्यांच्या यादीत आहे. वास्तविक या जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा वैभवशाली असताना त्याच्या श्रीमंतीचा गाजावाजा न होता केवळ जिल्ह्यातील उपेक्षित बाबींची चर्चा होऊन जिल्ह्यातील जनतेची मानसिकतेत न्यूनगंडता आणण्याचा प्रयत्न होत आहे. या पाश्र्वभूमीवर किमान सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा व त्यानिमित्ताने भरणा:या घोडे बाजाराला चालना मिळून चेतक फेस्टीवलची सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षी या फेस्टीवलला ब:यापैकी प्रतिसाद मिळाला. त्याच्या जाहिरातीही राज्यात व देशात झळकल्याने यंदा अजून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. या फेस्टीवलमुळे केवळ शासनाचा पैसा वाया जात असल्याचाही सूर व्यक्त करणारा एक गट आहे. परंतु सरकारतर्फे दरवर्षी राज्यात अनेक ठिकाणी असे फेस्टीवल व कार्यक्रम घेतले जातात. त्यावर कोटय़ावधींची उधळण होते. या पाश्र्वभूमीवर किमान सारंगखेडय़ाच्या चेतक फेस्टीवलमुळे अनेकांना रोजगार मिळाला. जिल्ह्याचे मागासपण त्यातून काहीअंशी तरी दूर होण्यास मदत झाली, जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना चालना मिळाली, यात्रेचे वैभव  वाढले, लोकांनी पर्यटन विभागाने केलेल्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष लाभ घेतला नसला तरी ते पाहून किमान डोळ्याचे पारणे फेडले. या यात्रेत अनेकांनी पर्यटनाचा आनंद घेतला. अशा कितीतरी जमेच्या बाजू नाकारता येणार नाहीत. या पाश्र्वभूमीवर रविवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने चेतक फेस्टीवलचा निधी देऊ नये, असे सरकारला शिफारस करणार असल्याचे सांगून हा फेस्टीवल लोकसहभागातून करण्याचा सल्ला दिला. मुळातच दुष्काळी स्थिती असल्याने लोकसहभागातून दुष्काळ निवारणाची कामे करण्याचा सल्ला देण्याऐवजी त्यांनी फेस्टीवल करण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे या फेस्टीवलसाठी सरकारला पैसे देऊ नये, अशी शिफारस करण्याचेही सांगितले. एकूणच विरोधाभास करणारे विधान त्यांनी केले. फेस्टीवलच्या निधीतून काय करावे याबाबत स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. तो निधी नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाच्या इतर कामांना देणार की इतर जिल्ह्यांना देणार याबाबतचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही. खरे तर दुष्काळी परिस्थितीमुळे फेस्टीवल झाल्यास किमान महिना-दीड महिना अनेकांना रोजगार मिळणार आहे. जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न आतापासूनच गंभीर झाला आहे. चेतक फेस्टीवलच्या नावाने या भागातील पर्यटनाची चर्चा आताशी सुरू झाली. या जिल्ह्यात तोरणमाळ, प्रकाशा, डाब, अस्तंबा आदी ठिकाणी पर्यटन विकासातून करण्यासारखी कितीतरी कामे आहेत. अनेकवेळा केवळ प्रस्ताव झाले पण ते धूळखात पडून आहेत. जर जिल्ह्याचा पर्यटन विकास झाला तर या जिल्ह्यातील मागासपण आपोआपच दूर होणार आहे. रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. पण त्याबाबत विचार न होता सुरू असलेला फेस्टीवल बंद करण्याची एकप्रकारे सरकारची मानसिकता असल्याची भाषा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष करीत आहेत. त्यामुळे जनमानसात नाराजीचा सूर आहे.दुसरीकडे चेतक फेस्टीवल आयोजन करणा:या पदाधिका:यांनीही सरकारच्या निधीचा पुरेपूर लोकांसाठी व या भागाच्या विकासासाठी कामाला येईल, याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी झालेल्या कार्यक्रमाने जिल्ह्यातून संमिश्र सूर व्यक्त होत        आहे. त्या लोकभावनांचा आदर करून यंदा नियोजनातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. नव्हे तर केवळ चेतक फेस्टीवल नाही तर त्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पर्यटन क्षेत्रांकडे लक्ष कसे वेधले जाईल व तेथील पर्यटनाला कसा वाव मिळेल याबाबतही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. तरच ख:या अर्थाने फेस्टीवलचा हेतूही साध्य होईल.