लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना काळातही आॅटोमोबाईल क्षेत्राने आपली घौडदौड कायम ठेवली आहे. आता दसरा, दिवाळीचा सिझन आला असतांना हे क्षेत्र आपल्या भरारीला सज्ज झाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या गेल्या व या वषाच्या दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टर विक्रीचा आढावा घेतला असता फारसा फरक नसल्याचे दिसून येत आहे.हौैस आणि गरजेला मोल आणि पर्यायही नसतो असे म्हटले जाते. जिल्ह्यातील आॅटोमोबाईल क्षेत्राचा विचार करता लॉकडाऊन आणि कोरोनाचा फारसा प्रभाव या क्षेत्रावर दिसून आलेला नाही. दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टर विक्री आणि आरटीओमध्ये त्यांची नोंदणीची स्थिती पहाता दिसून येते. नंदुरबार, शहादा या तालुक्यासह अगदी अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यातही नवीन वाहने खरेदी झालेली आहेत. त्यामुळे कोरोना काळात आॅटोमोबाईल क्षेत्राने आपला आलेख उंचावत ठेवला आहे.आता दसरा, दिवाळीचा सिझन सुरू होत आहे. या काळात या क्षेत्रात मोठी उलाढाल होत असते. ग्राहकांची मागणी आणि तसा पुरवठा करण्यासाठी सर्वच कंपन्यांचे दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टर विक्रेते सज्ज झाले आहेत. ग्राहकांकडून वाहनांची नोंदणीही सुरू झाली आहे. विविध योजनाही विक्रेत्यांकडून राबविल्या जातील.बॅकलॉग भरून निघणार...दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टर विक्रीचा बॅकलॉग दसरा, दिवाळीचा सिझनमध्ये भरून निघण्याची शक्यता आहे. अनलॉकनंतर वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद राहिल्याचे दुचाकी विक्रेते मुन्ना पटेल,नंदुरबार, ट्रॅक्टर विक्रेते शशिकांत पाटील, शहादा व चारचाकी विक्रेते किसन पवार, नंदुरबार यांनी सांगितले.वाहन मार्केट अपेक्षेप्रमाणे...कोरोना काळातही दुचाकीचे मार्केट चांगले राहिले. अपेक्षीत विक्री झाली. आता दसरा, दिवाळीसाठी बुकींग सुरू झाली आहे. मागणी तसा पुरवठा करण्याकडे सर्व विक्रेत्यांचा कल दिसून येत आहे.-ऋुषी पटेल, दुचाकी विक्रेता, नंदुरबार.
दुचाकी, चारचाकींची मागणी वाढली, ट्रॅक्टरलाही पसंती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:34 IST