ओला दुष्काळ जाहीर करण्याची कात्री ग्रामस्थांतर्फे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:47 PM2019-11-06T12:47:10+5:302019-11-06T12:49:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टीनंतर सातत्याने होणा:या पावसामुळे कात्री ता. धडगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये शेतक:यांचे मोठे नुकसान झाले ...

Demand by scissors to declare wet drought | ओला दुष्काळ जाहीर करण्याची कात्री ग्रामस्थांतर्फे मागणी

ओला दुष्काळ जाहीर करण्याची कात्री ग्रामस्थांतर्फे मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अतिवृष्टीनंतर सातत्याने होणा:या पावसामुळे कात्री ता. धडगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहेत. त्यामुळे या गावांमध्ये ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. 
दुर्गम भागातील कात्री ग्रामपंचायत अंतर्गत माकडकुंड, पौला, वाहवाणी, कात्री व कात्री फॉरेस्ट या चारही गावांमधील शेतक:यांनी मागील वर्षी घटलेले उत्पादन भरुन काढण्याच्या आशेवर यंदाच्या खरीप हंगामात शेती केली. सुरुवातीला पाऊस चांगला झाल्यामुळे भरघोस उत्पन्नाचीही स्वपAे तेथील शेतक:यांनी पाहिली, परंतु अतिवृष्टी कालावधीत पिकेच वाहून गेली. त्यात   पोहल्या डेमशा पाडवी, दामा भामटा वळवी, बोंडा सोता वळवी, टेंब:या गिरजा वळवी यांच्यासह अनेक शेतक:यांचा समावेश आहे. अतिवृष्टीनंतर उर्वरित पिके व काही अंशी शेतमालही सतत हाणा:या पावसामुळे सडली, त्यामुळे तेथील शेतक:यांवर मोठे संकट ओढवले आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी ग्कात्री ग्रामपंचायत अंतर्गत येणा:या सर्व गावांमध्ये ओला दुष्काळ जाहिर करीत नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी धडगाव तहसिलदारांकडे करण्यात करण्यात आली आहे. निवेदन देतांना सरपंच बारकीबाई मोहन वळवी, पंचायत समितीचे माजी सभापती टेडय़ा वळवी, संदीप वळवी, संतोष पाडवी, माकत्या वळवी, शाससिंग वळवी, सेमटय़ा वळवी, बोंडा वळवी, विरजी वळवी, माधव वळवी आदी उपस्थित होते. 
 

Web Title: Demand by scissors to declare wet drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.