तेलखेडी आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरूस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:51 PM2020-05-27T12:51:17+5:302020-05-27T12:51:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तेलखेडी, ता.धडगाव येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली असून, या इमारतीच्या दुरूस्तीचे काम ...

Demand for repair of Telkhedi Health Center building | तेलखेडी आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरूस्तीची मागणी

तेलखेडी आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरूस्तीची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तेलखेडी, ता.धडगाव येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली असून, या इमारतीच्या दुरूस्तीचे काम तत्काळ मंजूर करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य जान्या फुलजी पाडवी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे केली आहे.
यासंदर्भात जान्या पाडवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम २०११ मध्ये झाले होते. परंतु हे बांधकाम निकृष्ट झाल्याने स्लॅब, खिडक्या, दरवाजे यांची प्रचंड दुरवस्था झाली. पावसाळ्यात ही इमारत गळते. या संदर्भात गेल्या वर्षी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागीय अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी करून त्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. परंतु अद्यापही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. सद्याच्या स्थितीत आरोग्य केंद्रात सुविधा देण्यासाठी त्याठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने त्याची दखल घेऊन या इमारतीच्या दुरूस्तीच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देवून काम सुरू करावे, अशी मागणी पाडवी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांच्याकडे केली. या वेळी समाज कल्याण सभापती रतन पाडवी हेदेखील उपस्थित होते.

Web Title: Demand for repair of Telkhedi Health Center building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.